शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सिंगल बातम्या

By admin | Updated: February 20, 2016 02:01 IST

वृत्तपत्र मंचच्या स्पर्धेचा निकाल जाहीर

वृत्तपत्र मंचच्या स्पर्धेचा निकाल जाहीर
सोलापूर : जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचच्या वतीने पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत अंजली व्हनमाने (सहस्त्रार्जुन प्रशाला), मेघा र्शीशैल जोजन (गजानन महाराज विद्यामंदिर) या दोन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला़ या परीक्षेत द्वितीय - वैष्णवी कांबळे (पवार प्रशाला ), तृतीय - सौरभ भोसले (दमाणी प्रशाला) यांनी प्रावीण्य मिळवल़े अशोक म्हमाणे आणि सुनील पुजारी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिल़े

शिवजयंतीनिमित्त
एस़टी़कामगारांचे रक्तदान
सोलापूर : शिवजयंतीनिमित्त एस़टी़कामगार शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर राबवण्यात आल़े आगार व्यवस्थापक मधुरा जाधवर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाल़े या शिबिरात 50 जणांनी रक्तदान केल़े यावेळी स्थानकप्रमुख एस़एम़कदम, वाहतूक निरीक्षक पी़ एस़ हानगल, प्रकाश अवस्थी, बाळासाहेब मोरे, शहाजी घोडके, आय़ पी़ कोळी, रवी राठोड, डी़ के. सुरवसे, सुनील भोसले, ताराचंद राठोड उपस्थित होत़े

न्यू बसवेश्वर शिक्षण
संकुलात पालक मेळावा
सोलापूर : न्यू बसवेश्वर मराठी विद्यालय आणि मातोर्शी लक्ष्मीबाई हायस्कूलमध्ये पालक-शिक्षक मेळावा पार पडला़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालक समितीचे उपाध्यक्ष कंकरसिंग टांक होत़े प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक दीपक जवळकोटे, दीपक चिकलंडे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे तानाजी माने, शहाजी ठोंबरे, माधुरी लडाख, संतोष दरीगोळ, वर्षा हुंबे, बिराजदार उपस्थित होत़े यावेळी स्पर्धा परीक्षामध्ये यश संपादित विद्यार्थ्यांचा गौरव झाला़

शिवप्रभू प्रशालेत दहावी,
बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
सोलापूर :अकोलेकाटी येथील शिवप्रभू माध्यमिक प्रशालेत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला़ तसेच स्व़ अलकाताई बरडे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली़ याप्रसंगी संस्थेचे सचिव सुरेश जगताप, प्राचार्य शंकर वडणे, डॉ़ प्रीती र्शीराम, महादेव गोटे, लक्ष्मीकांत वेदपाठक यांची अतिथी म्हणून उपस्थिती होती़ याप्रसंगी विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आल़े यावेळी वक्त्यांनी मार्गदर्शन केल़े
अमर मराठी विद्यालयाचे
स्नेहसंमेलन थाटात
सोलापूर : उत्तर सदर बझार येथील अमर मराठी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन थाटात पार पडल़े कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालक समितीच्या सदस्या यास्मिन इनामदार होत्या़ अरुणा बोंडगे, वंदना अंबरकर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या़ पालक समितीच्या रेखा देशमुख आणि सुनीता दळवी यांनी मनोगत व्यक्त केल़े मुख्याध्यापक येलम यांनी प्रास्ताविकेतून आढावा घेतला़ यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुण दर्शनाचा कार्यक्रम झाला़ विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद दिली़

न्यू इंग्लिश स्कूलचे गणित,
आयसीटीचे प्रदर्शन
सोलापूर : सोशल असोसिएशन संचलित एस़ एस़ ए़ इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने भरवण्यात आलेल्या गणित आणि माहिती तंत्रज्ञान विषयाच्या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला़ या प्रदर्शनात चौथी ते नववी इयत्तेतील विद्यार्थ्यांनी गणिताचे चार्ट, संगणक माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत प्रयोग सादर केल़े मुख्याध्यापिका सॉलेहा वडवान यांनी विद्यार्थ्यांंच्या प्रयोगाचे कौतुक केल़े या प्रदर्शनासाठी गणित शिक्षक अमीर होटगी, सना शेख, यांनी पर्शिम घेतल़े