शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा महाविद्यालय २

By admin | Updated: August 10, 2015 23:28 IST

कुंभलकर समाजकार्य महाविद्यालय

कुंभलकर समाजकार्य महाविद्यालय
नागपूर : कुंभलकर समाजकार्य सांध्यकालीन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने कामगार भवन, रघुजीनगर परिसरात श्रमदानांतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रम अधिकारी डॉ. विनायक साखरकर यांच्या नेतृत्वात महाविद्यालयातील रासेयोचे ५० विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले. डॉ. साखरकर यांनी स्वच्छतेचे महत्त्व विशद करून परिसर स्वच्छ राखण्याचे आवाहन केले. याप्रसंगी कामगार कल्याण निरीक्षक लुले, डॉ. लक्ष्मीकांत चोपकर व प्रा. संगीता पाठराबे उपस्थित होते.
नवप्रतिभा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय
नागपूर : नवप्रतिभा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी शाखेत वर्ग ११ वीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पालक-शिक्षक संघाची यावेळी स्थापना करण्यात आली. जीवनविकास शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र झाडे, कार्याध्यक्ष बाबूराव झाडे प्रामुख्याने उपस्थित होते. पालक-शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी प्राचार्या माधुरी झाडे व उपाध्यक्षपदी दिलीप भांडारकर यांची निवड करण्यात आली.
सेंट्रल इंडिया पब्लिक स्कूल
नागपूर : वर्धमाननगर येथील सेंट्रल इंडिया पब्लिक स्कूल येथे फर्स्ट ट्रॅफिक सिग्नल दिवस साजरा करण्यात आला. १९१४ साली क्लीव लँड ओहिओ येथे हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. या दिनानिमित्त अखिलेश गुप्ता यांच्या नेतृत्वात यामाहा मोटर्सच्या टीमद्वारे वाहतुकींच्या नियमांची माहिती देणारा एक कार्यक्रम सादर करण्यात आला. शाळेचे संचालक प्रवीण तिवारी यांनी कार्यक्रमाची प्रशंसा केली. शाळेच्या समन्वयक फिजा खान यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
सेवादल महिला महाविद्यालय
नागपूर : सेवादल यिक्षण संस्थेंतर्गत सेवादल महिला महाविद्यालयातर्फे बांधलेल्या नरसाळा परिसरातील मुलींच्या वसतिगृहाचे राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आ. सुधाकर कोहळे, जि.प. सदस्य डॉ. शिवाजीराव सोनसरे, नेहरूनगर झोन सभापती मनीषा कोठे, संस्थेचे संस्थापक सदस्य केशवराव शेंडे, प्राचार्य प्रवीण चरडे तसेच विदर्भ बुनियादी महाविद्यालयाचे प्राचार्य डी.डी. कारमोरे प्रामुख्याने उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष संजय शेंडे यांनी प्रास्ताविक केले.