शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुढील शैक्षणिक वर्षापासून दप्तराचे ओझे कमी करणार

By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST

शैक्षणिक वर्षापासून दप्तराचे ओझे कमी करणार

शैक्षणिक वर्षापासून दप्तराचे ओझे कमी करणार
शिक्षणमंत्र्यांची ग्वाही
मुंबई :
शिक्षणमंत्र्यांनी शाळांमध्ये केलेल्या पाहणीमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे दप्तर त्यांच्या वजनापेक्षा अधिक असल्याचे पुन्हा समोर आले आहे. जून २0१६ या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी झालेले असेल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी दिली.
विलेपार्ले पूर्वेकडील पार्ले टिळक विद्यालय आणि महानगरपालिकेच्या दीक्षित प्राथमिक मराठी शाळेला त्यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांचे दप्तर वजनकाट्यावर वजन करून तपासले. या पाहणीत दप्तराचे वजन सरासरी ४ ते ६ किलो इतके असल्याचे आढळले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांचेही वजनकाट्यावर वजन करून पाहिले. विद्यार्थ्यांच्या वयाच्या तुलनेत दप्तराचे ओझे जास्त असल्याचे त्यांना यावेळी आढळून आले.
शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासनाने तज्ज्ञांची एक समिती गठीत केली आहे. ही समिती विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कसे कमी करता येईल, याबाबत उपाययोजना करणार आहे. दप्तराच्या ओझ्याविषयी आज केलेल्या पाहणीतील बाबी या समितीसमोर आपण मांडणार आहोत, असे तावडे यांनी या वेळी सांगितले.
दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सर्व भाषा एकत्र आणि गणित, विज्ञान अशी विभागणी करता येईल का, शाळेत विविध विषयांच्या तासांचे जे वेळापत्रक आहे ते बदलता येऊ शकेल का, एकाच दिवशी विषयानुसार विभागणी करून जास्त वेळचे तास करता येतील का, पुस्तकांचे चाचणीनिहाय विभाजन, सर्व विषयांची दर तिमाही अभ्यासक्रमानुसार परीक्षा या बाबींचाही विचार करण्यात येईल, असेही ते या वेळी म्हणाले.
दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी काय करता येईल, याबाबत तावडे यांनी विद्यार्थ्यांनाही प्रश्न विचारले. विविध विषयांचे दररोजचे वेळापत्रक कमी असावे, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना लॉकर्स देण्यात यावेत, विविध प्रोजेक्ट्सच्या व‘ा शाळेतच ठेवण्यात याव्यात, विषयानुसार एक वही आणि शीट्स असाव्यात, अशा काही सूचना विद्यार्थ्यांनी केल्या.
...........

पालिका शाळांतील मुलांच्या टॅबला शिक्षणमंत्र्यांची आडकाठी
मुंबई :
मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने आठवीच्या मुलांना टॅब देण्याचे जाहीर केले आहे. यासाठी अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली आहे. परंतु या टॅबला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आडकाठी लावली आहे. आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारे टॅब ते कसे हाताळतात. तसेच टॅब विद्यार्थ्यांना किती उपयुक्त आहे, हे तपासल्यानंतरच सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना टॅब देता येतील का, याबाबत विचार करण्यात येईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले.
......

तीन सत्रांत परीक्षेची तपासणी
महाराष्ट्रात तामिळनाडूच्या धर्तीवर तीन सत्रांत परीक्षा आणि त्यानुसार अभ्यासक्रम आखणी करणे शक्य आहे का, हेही तपासले जाईल, असेही तावडे यांनी यावेळी सांगितले.
...............