बँक एटीएमच्या लुटीची आकडेवारी नाही राज्यसभा : विजय दर्डा यांच्या प्रश्नाला उत्तर
By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST
नवी दिल्ली : गेल्यावर्षी देशभरातील किती बँक एटीएममध्ये लुटमारीच्या घटना घडल्या याची माहिती केंद्र सरकारकडे नसल्याचे गृहराज्यमंत्री हरिभाई परथीभाई चौधरी यांनी बुधवारी राज्यसभेत खा. विजय दर्डा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.
बँक एटीएमच्या लुटीची आकडेवारी नाही राज्यसभा : विजय दर्डा यांच्या प्रश्नाला उत्तर
नवी दिल्ली : गेल्यावर्षी देशभरातील किती बँक एटीएममध्ये लुटमारीच्या घटना घडल्या याची माहिती केंद्र सरकारकडे नसल्याचे गृहराज्यमंत्री हरिभाई परथीभाई चौधरी यांनी बुधवारी राज्यसभेत खा. विजय दर्डा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. बँकांच्या एटीएमवर होणारी चोरी किंवा दरोड्याच्या घटनांची आकडेवारी केंद्रीय स्तरावर ठेवली जात नाही. २०१२ मध्ये बँकांवर दरोड्याच्या एकूण २९ घटना घडल्या. लुटमारीचे १९१ गुन्हे दाखल झाले. २०१३ मध्ये दरोड्याची २८ प्रकरणे तर लुटमारीच्या ४८ घटनांची नोंद झाली, असे चौधरी यांनी लेखी उत्तरात सांगितले. अलीकडेच बँक एटीएममध्ये लूट आणि आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सरकारला याबाबत माहिती आहे काय? बँक एटीएम लुटण्याच्या किती घटना घडल्या याची सरकारकडे माहिती उपलब्ध आहे काय? लुटण्यात आलेल्या रकमेचा भारतविरोधी मोहिमेसाठी वापर केला जातो काय? याबाबत माहिती जाणून घेण्याची इच्छा खा. दर्डा यांनी व्यक्त केली होती. अशा घटनांची आकडेवारी ठेवली जात नाही, असे स्पष्ट करतानाच चौधरी म्हणाले की, २०१२ मध्ये महाराष्ट्रात बँकेवर दरोड्याची एक तर लुटमारीच्या चार घटनांची नोंद आहे. त्यात ३.५ लाख रुपये लुटण्यात आले. २०१३ यावर्षी महाराष्ट्रात बँक दरोड्याच्या एका घटनेत ६.९ लाख तर लुटमारीच्या ५ घटनांमध्ये चोरट्यांनी ६.६ लाख रुपये चोरून नेले.