शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ अधिकार मंडळांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता

By admin | Updated: July 7, 2015 22:56 IST

पुणे: विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ.अरुण निगवेकर यांच्या समितीने तयार केलेल्या विद्यापीठ कायद्यामध्ये काहीसे बदल करून नवीन विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या विद्यापीठ अधिकार मंडळांना एक वर्ष मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. सोमवारी मुंबई येथे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी कुलगुरूच्या बैठकीत याबाबत सुतोवाच केले. परिणामी अलिकडच्या काळात होणा-या विद्यापीठ निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळणार आहे.

पुणे: विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ.अरुण निगवेकर यांच्या समितीने तयार केलेल्या विद्यापीठ कायद्यामध्ये काहीसे बदल करून नवीन विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या विद्यापीठ अधिकार मंडळांना एक वर्ष मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. सोमवारी मुंबई येथे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी कुलगुरूच्या बैठकीत याबाबत सुतोवाच केले. परिणामी अलिकडच्या काळात होणा-या विद्यापीठ निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळणार आहे.
डॉ.अरुण निगवेकर समितीने राज्य शासनाला नवीन विद्यापीठ कायदा प्रस्ताव सादर केला.निगवेकर समितीने विद्यापीठ कायद्यात अधिसभेला स्थान दिले नव्हते. मात्र,अधिसभेचे अस्तित्व आबाधित राहिल,असे विनोद तावडे स्पष्ट केले.त्यामुळे निगवेकर समितीच्या अहवालात अधिसभेचा समावेश करून या कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. मात्र,या प्रक्रियेस सुमारे वर्ष भराचा कालावधी लागणार आहे.परिणामी सध्या अस्तित्वात असलेल्या विद्यापीठाच्या अधिकार मंडळास मुदतवाढ मिळेल आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह इतर विद्यापीठांच्या निवडणूका स्थगित होतील,अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरू आहे.
आघाडी सरकारच्या काळात नवीन कायद्याच्या अंमलबजावणी बाबत विचार झाला होता. परंतु,राज्य शासनाला नवीन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी लागणारा खर्च करणे शक्य नव्हते.त्यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीस विलंब होत असल्याचे तत्कालीन मंत्र्यांकडून सांगितले जात होते.मात्र,युती सरकारने विद्यापीठ कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सकारात्मक पाऊल टाकेल आहे.महाविद्यालयात पुन्हा एकदा विद्यार्थी निवडूका घेण्याचेही तावडे यांनी स्पष्ट केले आहे.परिणामी नवीन कायद्यात विद्यार्थी निवडणूका कशा घ्याव्यात,याबाबतही तरतूद केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

चौकट- राज्यातील महाविद्यालयीमधील प्राध्यापकांच्या अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे प्राध्यापकांची भरती प्रक्रिया आणि रोस्टर पतासणीबाबत येणा-या अडचणी तात्काळ सोडवणे आवश्यक आहे,या विषयावर मुंबई येथे कुलगुरूंच्या बैठकीत चर्चा झाली. तसेच शैक्षणिक प्रश्न समजून घेण्यासाठी दर तीन महिन्यांनी कुलगुरूंची बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.