शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

उलगडल्या करिअरच्या असंख्य वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2016 18:31 IST

या कार्यशाळेत संदीप पाटील यांनी दहावीनंतर कोणकोणत्या क्षेत्रात चांगले करिअर करता येऊ शकते, याविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली. अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रांसह महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणार्‍या विविध महत्त्वपूर्ण परीक्षांविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. दहावीनंतर विद्यार्थ्यांना आयटीआय, ११ वी कला, ११ वाणिज्य किंवा ११ वी विज्ञान शाखेतही प्रवेश घेता येऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे; शिवाय ज्यांना आपल्या आई-वडिलांना लवकर मदतीचा हात देण्याची इच्छा आहे; अशा विद्यार्थ्यांनी आयटीआय किंवा डिप्लोमाकडे वळावे. ११ वी कला शाखेच्या माध्यमातून पुढे डी.एड् व बी.एड् करून शिक्षकाची नोकरी मिळवता येऊ शकते. ११ वाणिज्य शाखेच्या माध्यमातूनही पुढे सीए, टॅक्स कन्सल्टंट, बीबीए, एमबीबी यासारखे कोर्स करता येऊ शकतात. तसेच ज्या विद्यार्थ्यांना अभियां

या कार्यशाळेत संदीप पाटील यांनी दहावीनंतर कोणकोणत्या क्षेत्रात चांगले करिअर करता येऊ शकते, याविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली. अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रांसह महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणार्‍या विविध महत्त्वपूर्ण परीक्षांविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. दहावीनंतर विद्यार्थ्यांना आयटीआय, ११ वी कला, ११ वाणिज्य किंवा ११ वी विज्ञान शाखेतही प्रवेश घेता येऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे; शिवाय ज्यांना आपल्या आई-वडिलांना लवकर मदतीचा हात देण्याची इच्छा आहे; अशा विद्यार्थ्यांनी आयटीआय किंवा डिप्लोमाकडे वळावे. ११ वी कला शाखेच्या माध्यमातून पुढे डी.एड् व बी.एड् करून शिक्षकाची नोकरी मिळवता येऊ शकते. ११ वाणिज्य शाखेच्या माध्यमातूनही पुढे सीए, टॅक्स कन्सल्टंट, बीबीए, एमबीबी यासारखे कोर्स करता येऊ शकतात. तसेच ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रात जायचे असेल, त्यांनी आतापासूनच एमएच-सीईटी, जेईई, नीट अशा प्रवेश परीक्षांची पूर्वतयारी केली पाहिजे. ११ वी, १२ वी विज्ञान शाखेच्या माध्यमातून पुढे करिअरच्या असंख्य वाटा आहेत. आयआयटी, वैद्यकीय, अभियांत्रिकी, शासकीय सेवा, एसएटी-एमसीएटी (या प्रवेश परीक्षा देऊन विदेशात वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी क्षेत्रात नोकरी करता येते), स्पर्धा परीक्षा अशा विविध क्षेत्रांमध्ये १० वीनंतर उत्तम संधी असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले.
पूरक व्यवस्था असल्याशिवाय करिअरचा मार्ग बदलू नका
अनेक जण १० वी किंवा १२ वीनंतर स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्राकडे वळतात. मात्र, हे क्षेत्र प्रचंड आव्हानात्मक आहे. दीर्घकाळ संघर्ष व मेहनत घेतल्यानंतरही या क्षेत्रात पदरी अपयश येते. अशा वेळी खूप वेळ निघून जाते. त्यामुळे पूरक व्यवस्था असल्याशिवाय कधीही करिअरचा मार्ग बदलू नये. अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रातील पूर्ण शिक्षण घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षांच्या मार्गावर चालावे. दुर्दैवाने या मार्गावर चालताना अपयश आले तरी आधी घेतलेल्या शिक्षणामुळे नोकरी मिळवता येते, असा मौलिक सल्ला संदीप पाटील यांनी कार्यशाळेत दिला.
या कार्यक्रमासाठी अक्षय पवार, पंकज पाटील, चेतन जाधव, चेतना बर्‍हाटे, विनोद शिरसाठ, पूनम पाटील यांच्यासह विवेकानंद क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.