शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आता परीक्षांसाठी आयसोलेटेड क्लासचा फंडा

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

पुणे : दहावी - बारावीच्या परीक्षांदरम्यान होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी या परीक्षा मोबाईल व इतर साधनांना बंदी असेल अशा आयसोलेटेड क्लासमध्ये घेण्याचा फंडा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काढला आहे. तसे संकेत त्यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले.

पुणे : दहावी - बारावीच्या परीक्षांदरम्यान होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी या परीक्षा मोबाईल व इतर साधनांना बंदी असेल अशा आयसोलेटेड क्लासमध्ये घेण्याचा फंडा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काढला आहे. तसे संकेत त्यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले.
सध्या सुरू असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेदरम्यान काही गैरप्रकार समोर आले आहेत. तसेच व्हॉटसअपच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांकडे पत्रकारांनी शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले असता यापुढील परीक्षा आयसोलेटेड रूममध्ये घेण्याचा विचार असल्याचे तावडे म्हणाले. परीक्षा केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल व इतर साधने नेण्यास बंदी असते. त्यामुळे प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांकडून फोडल्या जात नाहीत. प्रश्नपत्रिका फुटणे हा सामाजिक कलंक असून एक दिवस आधी प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार बंद झाले असले तरी प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळेला असे प्रकार समोर येतात. विद्यार्थी वगळून इतर घटकांकडून हे प्रकार घडत असल्याने ज्या ठिकाणी मोबाईल व इतर साधनांना बंदी असेल अशा आयसोलेटेड क्लासमध्ये परीक्षा घेण्यात येतील, असे तावडे यांनी सांगितले.
बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना शाळेशेजारी लग्न किंवा अन्य समारंभांना परवानगी देऊ नये, अशा सूचनाही करण्यात आल्याचे तावडे यांनी सांगितले. मंडळाच्या उत्तरपत्रिका सुरक्षितरित्या बोर्डापयंर्त पोहोचवणे आवश्यक असले, तरीही प्रत्येक शाळेला किंवा शिक्षकांना गाडी देणे शक्य होणार नाही. त्यामुळे सध्याच्या व्यवस्थेत एकही उत्तरपत्रिका गहाळ होणार नाही, हे पाहणे संबंधित शिक्षक व कर्मचार्‍यांची जबाबदारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
--------
चौकट
शिक्षण मंडळांकडेच राहणार अधिकार?
शिक्षण हक्क कायद्यानुसार महापालिकांच्या शिक्षण मंडळांचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. हे अधिकार आयुक्तांकडे सोपविण्यात आले आहेत. याबाबत बोलताना विनोद तावडे यांनी शिक्षण मंडळाला अधिकार देण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले. याबाबत तावडे हे सुरूवातीपासून आग्रही होते. त्यामुळे मंडळांना अधिकार परत मिळतील, असेच संकेत त्यांनी यावेळी दिले.
------------