शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

एनसीसी, एनएसएस सक्तीचे

By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST

एनसीसी, एनएसएस सक्तीचे

एनसीसी, एनएसएस सक्तीचे
पुढील वर्षापासून अंमलबजावणी : केंद्रीय सल्लागार मंडळाची मंजुरी
अतुल कुलकर्णी
मुंबई : शालेय स्तरापासून मुलांवर देशसेवेचे संस्कार रुजावेत, स्वसंरक्षणाची सज्जता अंगी बाळगली जावी आणि पर्यावरणविषयक जागृतीचे बिजारोपण व्हावे, अशा व्यापक उद्देशाने माध्यमिक आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात यापुढे राष्ट्रीय छात्र योजना (एनसीसी) आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) हे दोन विषय सक्तीचे होणार आहेत. दिल्लीत झालेल्या सेंट्रल ॲडव्हायझरी बोर्ड फॉर एज्यूकेशन (कॅब) च्या बैठकीत देशभरातील शिक्षणमंत्र्यांनी यासाठी आग्रह धरल्याने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
इयत्ता आठवीपासून ते पदवी शिक्षणापर्यंत एनसीसी विषय आहे. या विषयातंर्गत विद्यार्थ्यांना परेड, संरक्षणशास्त्र, शस्त्रास्त्राचे प्रशिक्षण, कॅम्प व धाडसी खेळाचे प्रशिक्षण यातून दिले जाते. शिवाय, संरक्षण दलातील निवडीसाठी एनसीसीच्या कॅडेस्ना प्राधान्य दिले जाते. इस्त्रायलमध्ये १२ वी नंतर मुलांना तीन वर्षे आणि मुलींना २ वर्षे सैनिकी शिक्षण सक्तीचे आहे. तर ग्रीस, सिंगापूर, साऊथ कोरिया अशा काही देशांमध्येदेखील ही सक्ती आहे. आपल्याकडे एनसीसी हा विषय ऐच्छिक आहे. मात्र आता तो सक्तीचा करावा, असा प्रस्ताव कॅबने मंजूर केला आहे.
महाविद्यालयीन स्तरावर असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेतून सामाजिक आणि पर्यावरणविषयक जाणीव जागृतीचे प्रशिक्षण दिले जाते. सामाजिक सहजीवन आणि ग्रामीण विकासविषयक दृष्टिकोन विकसीत होण्यासाठी एनएसएसचा अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त असल्याने हा विषयदेखील ऐच्छिक न ठेवता सक्तीचा करण्यात येणार आहे.
नवीन शैक्षणिक धोरण आखण्यासाठी केंद्रीय शैक्षणिक सल्लागार मंडळाने विविध उपसमित्या स्थापन केल्या आहेत. तंत्रशिक्षण व किमान कौशल्य विकास या विषयाशी संबंधीत समितीवर राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
...............................
शाळांना लोकप्रतिनिधींचा निधी
महाराष्ट्रात अनेक शाळा विश्वस्त संस्थांमार्फत चालविल्या जातात. या शाळांना केवळ ४ टक्के वेतनेतर अनुदान मिळते. त्यातून पायाभूत सोयी सुविधा देणे अवघड होते. शिवाय, या शाळांच्या जमिनींचे प्रॉपर्टी कार्ड विश्वस्त संस्थांच्या नावे असल्यामुळे आमदार किंवा खासदार निधीतून या संस्थांना मदत देता येत नाही. ही अडचण फक्त महाराष्ट्रात आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक धोरणात बदल करण्याचा निर्णय यावेळी झाला.
..................................
पाण्याचे ओझे ३० टक्के
सरकारने शाळांना वॉटर प्युरीफायर दिले पण अनेक शाळा त्याची देखभाल नीट करत नाहीत. मात्र यापुढे शाळांनी व सरकारने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि दप्तरातले ३० टक्के ओझे कमी करावे, असा प्रस्तावही या धोरणाचा भाग बनणार आहे.