शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मसूदा प्रादेशिक भाषेत करण्यास मंत्र्यांची मान्यता जल मसुद्याला सूचनासाठी एक महिना वाढिव मुदत

By admin | Updated: February 2, 2016 00:15 IST

फोटो : राज्यातील जलस्त्रोताचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी जल धोरणात महत्त्वाचे बदल आवश्यक आहेत. (छाया : विशांत वझे)

फोटो : राज्यातील जलस्त्रोताचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी जल धोरणात महत्त्वाचे बदल आवश्यक आहेत. (छाया : विशांत वझे)
डिचोली : गोव्याचे जलस्त्रोत संकटग्रस्त बनलेले असताना ते पुर्नजीवीत करण्यासाठी त्याचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी खास मोहिम आखण्यात आलेली असून गोव्याचे जलधोरणाचा राज्याच्या अस्तित्वासाठी महत्त्वाचे आहे. जलधोरणाचा मसूदा मराठी व कोकणीत अनुवादीत करून तो प्रत्येक पंचायत व नगरपालिकापर्यंत पोचवण्यात येणार असून एक महिना खुला ठेवण्यात येणार असल्याची माहिती जलसंसाधन मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी दिली.
गोवा सरकारने हल्लीच जलधोरणाचा मसूदा इंग्रजीतून सर्व संकेतस्थळावर खुला केला होता. मात्र तो मराठीव कोकणी भाषेतून प्रसारित करावा, अशी मागणी पर्यावरण कार्यर्त्यांनी केली होती. सदर धोरणासंदर्भात जलसंसाधन मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी दोन्ही भाषेत जलमसुदा उपलब्ध करून देण्याबरोबरच जनतेने सर्व सूचना द्याव्यात यासाठी एका महिन्याची मुदत वाढवूनही दिली असून आपल्या सूचना देण्याचे आवाहन केले आहे.
म्हादई बचाव अभियानाच्या अध्यक्षा निर्मला सावंत, सरचिटणीस राजेंद्र केरकर यांनी आज मंत्र्यांची भेट घेऊन जलमसुद्याला अभियानातर्फे दुरुस्ती आणि सूचना सादर केल्या. राज्याचे जलधोरण हे गोव्याच्या वर्तमान आणि भविष्यासाठी महत्त्वाचे असून ते जनतेपर्यंत पोचणे महत्त्वाचे आहे. आगामी काळात पाण्याचा प्रश्न बिकट होणार असल्याने नदी, नाले, तलाव, झरी यांचे अस्तित्व अबाधित राहणे महत्त्वाचे असल्याचे सौ. सावंत यांनी मंत्र्यांना सांगितले.
गोवा सरकारने गेल्या महिन्यात खुला केलेला मसूदा इंग्रजीत होता. तो स्थानिक भाषेत करण्याची व जनतेपर्यंत पोचवण्याची पंचायत, नगरपालिकेमार्फत पोचावा यासाठी अभियानाचे उपाध्यक्ष डॉ. नंदकुमार कामत यांनी सूचना केली होती. राज्यातील विविध समाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, पंचायती, पालिका यांनी हा मसूदा अभ्यासून आवश्यक सूचना करताना जलस्त्रोतांचे संरक्षण करण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत सूचना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.