शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

चित्रकलेतून दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

By admin | Updated: January 24, 2016 22:20 IST

जळगाव : ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी वर्षानिमित्ताने रविवारी जिल्हास्तरीय खुली चित्रकला स्पर्धा झाली. तीन गटात झालेल्या या स्पर्धकात विद्यार्थ्यांनी एका पेक्षा एक चित्रे रेखाटली. त्यांच्या चित्रातून समाजातील ज्वलंत विषयावर जनजागृती करीत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.

जळगाव : ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी वर्षानिमित्ताने रविवारी जिल्हास्तरीय खुली चित्रकला स्पर्धा झाली. तीन गटात झालेल्या या स्पर्धकात विद्यार्थ्यांनी एका पेक्षा एक चित्रे रेखाटली. त्यांच्या चित्रातून समाजातील ज्वलंत विषयावर जनजागृती करीत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
आर. आर. विद्यालयालयाच्या प्रांगणात ही स्पर्धा झाली. स्पर्धेत जिल्हाभरातून ३ हजार स्पर्धक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास साधताना त्यांच्यातील कलागुण विकसित व्हावेत, हा उद्देश डोळ्यासमोर ही स्पर्धा घेण्यात आली. प्रारंभी स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरविंद लाठी, सचिव मुकुंद लाठी, सदस्य अविनाश लाठी, शिक्षणतज्ज्ञ एम. के. कासट, मुख्याध्यापक डी. एस. सरोदे, मुख्याध्यापक जयप्रकाश लांबोळे, प्राचार्य पंकज कुलकर्णी उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी अरूण सपकाळे, बी. बी. तायडे, के. डी. शेलकर, बी. एम. सुतार, वाय. बी. न्हासदे यांनी परिश्रम घेतले.
समाजातील ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत
इयत्ता पाचवी ते सातवीच्या गटातील स्पर्धकांसाठी परिसरात स्वच्छता करणारी मुले, शेतात काम करणारे शेतकरी कुटुंब, वृक्षारोपणाचा कार्यक्रम व इयत्ता आठवी ते दहावीच्या गटासाठी राष्ट्रीय एकात्मता, भारतीय सण, उत्सव, दुष्काळग्रस्तांना मदत करणारे नागरिक असे विषय देण्यात आले होते. महाविद्यालयीन गटातील विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती, बेटी बचाव, पाणी वाचवा यावर चित्रे काढली. स्पर्धेत विजयी ठरलेल्या स्पर्धकांना रोख स्वरूपात बक्षीस, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह दिले जाणार आहे.
आर. आर. विद्यालयात तीन दिवस चित्रांचे प्रदर्शन
स्पर्धेतील निवडक चित्रांचे जिल्हास्तरीय प्रदर्शन ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या दरम्यान जळगावकर नागरिकांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन पेपर शिल्पकार राजेंद्र गोळे यांच्या हस्ते होईल.