शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्यवस्थापन परिषद सदस्यांच्या विदेश दौर्‍यावरून वाद !

By admin | Updated: July 20, 2015 23:59 IST

मराठवाडा विद्यापीठ : विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी संघटनांचा विरोधऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे आठ सदस्य अभ्यास दौर्‍यासाठी सपत्नीक युरोपला जाणार असल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे यांनी दौर्‍याचे जोरदार समर्थन केले, तर विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी संघटनांनी त्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. दौर्‍याविरोधात ...


मराठवाडा विद्यापीठ : विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी संघटनांचा विरोध

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे आठ सदस्य अभ्यास दौर्‍यासाठी सपत्नीक युरोपला जाणार असल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे यांनी दौर्‍याचे जोरदार समर्थन केले, तर विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी संघटनांनी त्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. दौर्‍याविरोधात विद्यार्थी आंदोलन छेडण्याच्या विचारात आहेत.
दुष्काळामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना एकीकडे विद्यापीठीचे शुल्क भरणेही अवघड झाले असताना व्यवस्थापन परिषदेचे सदस्य गुपचूप परदेश दौर्‍यावर निघाल्याने त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. १ ऑगस्टपासून हा दौरा सुरू होईल. कोणालाही खबर लागणार नाही, अशा पद्धतीने विद्यापीठाने हा दौरा आखला. मात्र, ट्रॅव्हल्सची चार दिवसांपूर्वी बुकिंग झाल्यानंतर प्रकार उघड झाला.
विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात व्यवस्थापन परिषद सदस्यांच्या परदेश दौर्‍यासाठी २५ लाख रुपयांची मार्च महिन्यातच तरतूद करण्यात आली आहे. दौर्‍यासाठी प्रत्येक सदस्यावर एक लाख ८० हजार रुपये खर्च होणार आहेत. ज्यांच्या पत्नी दौर्‍यावर जातील, त्यांचा खर्च सदस्य स्वत: करणार आहेत. युरोपमधील ट्रॅव्हल्स आणि टुरिझमचा अभ्यास करणे दौर्‍याचा उद्देश आहे, असे कुलगुरुंनी सांगितले.
व्यवस्थापन परिषदेचे सदस्य कोणत्या विद्यापीठात जाणार आहेत, याचे उत्तर मात्र कुलगुरूंना देता आले नाही. कोणत्या विद्यापीठात जायचे त्याचा कार्यक्रम ठरविला जात आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पैशांची ही उधळप˜ी नाही का, यावर ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याचे चोपडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
-----------------
सुमारे पंधरा दिवसांसाठीच्या या दौर्‍यात सदस्य जर्मनी, इटली, फ्रान्स, बेल्जियम, स्वीत्झर्लंड या देशांना भेट देणार आहेत.
---------------------