महानगर नियोजन समितीची आज बैठक
By admin | Updated: January 30, 2015 21:11 IST
नागपूर: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दु. १.३० वा. विभागीय आयुक्त कार्यालयात नागपूर महानगर नियोजन समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे.
महानगर नियोजन समितीची आज बैठक
नागपूर: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दु. १.३० वा. विभागीय आयुक्त कार्यालयात नागपूर महानगर नियोजन समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे. शहराच्या सीमेपासून २५ किलोमीटरपर्यंतच्या विकासासाठी महानगर नियोजन समिती स्थापन करण्यात आली होती. मुख्यमंत्री या समितीचे अध्यक्ष असून सुधार प्रन्यासचे सभापती सदस्य सचिव आहेत. ४५ सदस्यीय समितीत ३० लोकनियुक्त तर १५ अधिकाऱ्यांचा समावेश होता. लोकनियुक्त सदस्यांसाठी निवडणुका झाल्यानंतर फक्त एक वेळा समितीची बैठक झाली. त्यानंतर बैठकच झाली नाही. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी १५ सदस्य नामनिर्देशित केले. त्यात रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, आशिष देशमुख,डॉ. मिलिंद माने आणि उर्वरित अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान यापूर्वी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महानगर नियोजन समितीच्या निवडणुका मार्चपर्यंत घेण्याचा मनोदय व्यक्त केला होता. यासंदर्भातही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)