शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
3
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
4
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
5
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
6
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
7
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
8
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
9
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
10
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
11
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
12
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
13
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
14
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
15
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
16
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
17
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
18
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
19
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
20
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची

म. गांधीजी बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे होते (भाग १)

By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST

- महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे गांधीजींची पुण्यतिथी : प्रार्थनासभा आणि चर्चासत्र

- महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे गांधीजींची पुण्यतिथी : प्रार्थनासभा आणि चर्चासत्र
नागपूर : महात्मा गांधी यांचे नाव घेतल्यावर आपल्यासमोर फक्त या देशाचे राष्ट्रपिता आणि खादीचा प्रसार करणारे, स्वदेशी आंदोलन उभारणारे राष्ट्रभक्त अशीच काहीशी प्रतिमा निर्माण होते. त्यात काहीही गैर नाहीच पण यापलिकडेही गांधींजींचे व्यक्तिमत्त्व फारच समृद्ध होते. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाच ते माहीत आहे. त्यावर फारसे लिहिले गेले नाही आणि त्याची चर्चाही झाली नाही. देशाच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेणारा हा नेता बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा धनी होता. कलांवर प्रेम करणारे, रागसंगीताचे ज्ञान असणारे, अध्यात्माची ताकद असणारे आणि तरीही मिश्किल, विनोदी स्वभावाचे गांधीजी होते, अशी आठवण त्यांच्यासह प्रत्यक्ष काम केलेले स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय बरगी गुरुजी यांनी सांगितली.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे कस्तुरबा भवन, बजाजनगर येथे महात्मा गांधी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त प्रार्थनासभा आणि बंधूता विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी गांधींजींच्या अनेक आठवणी बरगे गुरुजी यांनी सांगितल्या. गांधींजींच्या व्यक्तिमत्त्वाचे हे नवे पैलू नव्या पिढीसाठी नवीन होते. त्यामुळे या कार्यक्रमात कुतूहल निर्माण झाले. याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून म्यूर मेमोरिअल हॉस्पिटलचे संचालक विलास शेंडे, कोळसा कामगार नेते माजी आ. एस. क्यू. जामा, सर्वोदयी विचारवंत प्राचार्य आत्माराम उखळकर, गांधी स्मारक निधीचे सचिव सुनील पाटील उपस्थित होते. गांधीजी रोज प्रार्थनासभा घेत आणि त्यानंतर उपस्थितांशी चिंतनपर संवाद करीत. यातूनच देशाच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी शोधली. त्यांच्या प्रार्थनासभेत बरगी गुरुजींचा सातत्याने सहभाग राहिला आहे. यावेळी बरगी गुरुजी म्हणाले, गांधीजींशी प्रत्यक्ष संपर्क आलेले लोक आज फार कमी आहेत. पण मला त्यांना जवळून अनुभवता आले. त्यांच्यातील द्रष्टा नेता आणि राष्ट्रभक्त आपल्याला माहीत आहे. पण प्रार्थनासभेनंतर गांधीजी आपल्या अनुयायांशी विविध प्रश्नांवर चर्चा करीत होते. एकदा गांधीजी आणि कस्तुरबा यांचा सत्कार समारंभ त्यांच्या अनुयायांनी आयोजित केला होता. सारेच गांधीजींना बापू म्हणायचे. बापूंच्या सत्कारानंतर कस्तुरबा यांचा सत्कार केला गेला. त्यावेळी बापू म्हणाले, बापू मध्ये बा आहेच मग पुन्हा तिचा सत्कार कशाला करता, त्यावेळी हसे पिकले होते. अनेकदा फार गंभीर विषय बापू विनोदातून सोडवायचे. असे अनेक किस्से यावेळी त्यांनी सांगितले.