शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

हसो , खुश रहो! रडून, थांबून कसं चालेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 15:46 IST

ती व्यक्ती थोडेच दिवस का येते आपल्या आयुष्यात? इमोशनली ढपलेल्या आपल्या जगण्याला थोडासा आनंदाचा शिपका द्यायला? कठीण प्रसंगात तुम्हाला मदत करायला? आपलं कुणीच नाही जवळचं असं वाटत असताना तुमच्यासाठी काय वाट्टेल ते करण्याची तयारी दाखवायला, कोण येतं मदतीला ? ते दोस्तच ना...

-चिन्मय लेले

 

माणसं आयुष्यात येतात. जातात.

काही माणसं येतात फक्त एक ‘निमित्त’ होऊन;

काही कामापुरती, काही कारणांपुरती!

काम संपलं की, जातात निघून!!

आणि काही माणसं मात्र ऋतूंसारखी.

येतात आणि जगण्याचा मौसमच बदलून टाकतात.

आपण त्यांच्या रंगात रंगतो,

त्या मौसमाचेच होऊन जातो!

काही माणसं मात्र ‘जगणं’ होऊन येतात;

आपलं जगणं त्यांच्या जगण्याचाच भाग होऊन जातं;

ते येतात आणि आयुष्यभर राहतात.

कधी प्रत्यक्षात; तर कधी आठवणी बनून.

पण ती माणसं आयुष्यभर राहण्यासाठीच येतात.

***

निमित्त होऊन आलेली माणसं;

घटकाभरच्या प्रवासात भेटल्यासारखी.

प्रवास मजेत होतं, खूप गप्पा होतात,

मस्त गट्टी जमते, आपण हरखून जातो;

पण प्रवास संपतो,

त्या माणसाचा किंवा आपला थांबा येतो

आणि ती माणसं निघून जातात,

अनोळखी चेहर्‍यात हरवून जातात.

मग ती माणसं आपल्या आयुष्यात नाहीत

म्हणून रडून, थांबून कसं चालेल?

उलट विचार करुन पहा;

ती व्यक्ती थोडेच दिवस  का आपल्या आयुष्यात?

इमोशनली ढपलेल्या आपल्या जगण्याला

थोडासा आनंदाचा शिपका द्यायला?

कठीण प्रसंगात तुम्हाला मदत करायला?

आपलं कुणीच नाही जवळचं असं वाटत असताना

तुमच्यासाठी काय वाट्टेल ते करण्याची तयारी दाखवायला?

तुम्ही किती स्पेशल आहात, हे तुम्हाला समजावून द्यायला?

**

आपलं प्रत्येकाचं कारण असेलही वेगळं.

पण अशी निमित्तानं आलेली माणसं

आपलं जगणं उजळून टाकताता काही काळासाठी!

आणि मग निघून जातात.

***

त्यांच्या जाण्याचा खूप त्रास होतो.

आपण खूप त्रागाही करतो

स्वतर्‍ला किंवा त्या व्यक्तीला दोष देतो.

आणि जे मिळालेलं असतं ते ही नाकारत बसतो.

**

असं का करायचं?

आपण जे जगतो ते भरपूर जगायचं.

आपल्यासोबत असलेल्या माणसांना

बांधून घालण्यापेक्षा,

अपेक्षांची ओझी लादण्यापेक्षा जाऊ द्यावं, जायचं असेल तर.

आणि म्हणावं की, चार क्षण का होईना;

किती आनंद मिळाला.

किती सुंदर झाला प्रवास.

***

आपले हसरे क्षण

हीच आपली पूंजी.

ती रडक्या आठवणींवर का खर्च करायची?

( इंटरनेटवर फॉरवर्ड होत असलेल्या ‘रिझन-सिझन’ मेसेजचा मुक्त अनुवाद)