शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

चोपड्याला स्वतंत्र अल्पसंख्यांक आयटीआय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2016 22:45 IST

जळगाव : अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण मिळावे म्हणून १० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून त्या अंतर्गत चोपडा येथे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला (आयटीआय) मंजुरी देण्यात आल्याची माहिती महसूल तथा अल्पसंख्यांक विकास मंत्री एकनाथराव खडसे यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली. या शिवाय जळगाव लोकसभा मतदारसंघातही अशा आयटीआयला मंजुरी देण्यात येईल अशीही ग्वाही त्यांनी दिली.

जळगाव : अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण मिळावे म्हणून १० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून त्या अंतर्गत चोपडा येथे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला (आयटीआय) मंजुरी देण्यात आल्याची माहिती महसूल तथा अल्पसंख्यांक विकास मंत्री एकनाथराव खडसे यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली. या शिवाय जळगाव लोकसभा मतदारसंघातही अशा आयटीआयला मंजुरी देण्यात येईल अशीही ग्वाही त्यांनी दिली.
रविवारी दुपारी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेेल्या पत्रपरिषदेत खडसे यांनी अल्पसंख्यांक समाजासाठी राबविण्यात येणार्‍या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये त्यांनी चोपडा येथे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र आयटीआय मंजूर करण्यात आले असून त्यासाठी जागेचाही लवकरच आढावा घेण्यात येणार आहे. तसेच खासदार ए.टी. पाटील यांनीही त्यांच्या मतदार संघात असे आयटीआय असावे, अशी मागणी केली असून त्यालाही मान्यता देण्यात येईल. मल्टी सेक्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम (एमएसडीपी) अंतर्गत यासाठी १० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

शिष्यवृत्ती पाच लाखावर...
अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या शिष्यवृत्तीसाठी दोन लाख रुपये खर्च करण्यात येतात. हा निधी वाढवून पाच लाख रुपये करण्यात आल्याचेही खडसे यांनी या वेळी सांगितले.

उत्त्पन्नाची मर्यादा वाढविली...
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना प्रवेश देताना ज्यांचे उत्पन्न अडीच लाख रुपये आहे अशा पालकांच्या पाल्यांना प्रवेश शुल्क (फी) माफ करण्यात येते. आता या उत्पन्नाची मर्यादा वाढवून सहा लाख रुपये करण्यात आली आहे.

दरवर्षी जिल्ह्यात एकतरी वस्तीगृह...
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात एकतरी वस्तीगृह व्हावे यासाठी प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

भरतीपूर्व प्रशिक्षणात मोफत सोय...
पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी येणार्‍या प्रशिक्षणार्थ्यांना सध्या दीड हजार रुपये स्टायपेंड दिले जाते. ते वाढवून आता १९०० रुपये करण्यात आल्याचे सांगून या प्रशिक्षणार्थ्यांना जेवण, निवासाची मोफत सोय करण्यात येणार आहे.

हेल्मेट सक्ती टप्या-टप्याने व्हावी...
हेल्मेट सक्तीसंदर्भात पत्रकारांनी खडसे यांना विचारले असता ते म्हणाले, या संदर्भात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा झालेली नाही, मात्र उच्च न्यायालयाचे तसे आदेश आहे. हेल्मेट वापरले पाहिजे, मात्र सध्या त्याची उपलब्धतता तेवढी नसल्याने ती टप्या-टप्याने सक्ती केली पाहिजे. या संदर्भात आपण परिवहनमंत्र्यांशी चर्चा करणार आहे.