शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

योग्य मार्ग निवडल्यास जीवन यशस्वी - देशमुख

By admin | Updated: March 3, 2016 01:57 IST

दिंडोरी - तालुक्यातील जानोरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयाच्या वतीने एस.एस.सी.2016 च्या विद्यार्थ्यांसाठी निरोप व शुभचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्य व स्कूल कमीटी अध्यक्ष शंकर काठे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून समाज कार्य महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमुख व कवी प्रशांत केंदळे उपस्थितीत होते.प्राचार्य विलास देशमुख यांनी मार्गदर्शन करतांना अपयश आले तरी खचून न जाता योग्य मार्ग निवडून यशस्वी जीवन जगता येते हे उदाहरणे देऊन स्पष्ट केले. आईवडील, शाळा, शिक्षक, समाज, देश यांचे आपणावर मोठे ऋण असून त्यांच्या ऋणात राहून विद्यार्थ्यांनी आपली वाटचाल करावी व नावलौकिक मिळवून यशस्वी व्हावे. तसेच शिक्षणाबरोबर उत्तम दर्जाचे नागरिक घडणेही देशासाठी गरजेचे असून चांगल्या नागरीकांमुळेच देशाची प्रगती होते. म्हणून विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टी आत्मस्

दिंडोरी - तालुक्यातील जानोरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयाच्या वतीने एस.एस.सी.2016 च्या विद्यार्थ्यांसाठी निरोप व शुभचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्य व स्कूल कमीटी अध्यक्ष शंकर काठे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून समाज कार्य महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमुख व कवी प्रशांत केंदळे उपस्थितीत होते.प्राचार्य विलास देशमुख यांनी मार्गदर्शन करतांना अपयश आले तरी खचून न जाता योग्य मार्ग निवडून यशस्वी जीवन जगता येते हे उदाहरणे देऊन स्पष्ट केले. आईवडील, शाळा, शिक्षक, समाज, देश यांचे आपणावर मोठे ऋण असून त्यांच्या ऋणात राहून विद्यार्थ्यांनी आपली वाटचाल करावी व नावलौकिक मिळवून यशस्वी व्हावे. तसेच शिक्षणाबरोबर उत्तम दर्जाचे नागरिक घडणेही देशासाठी गरजेचे असून चांगल्या नागरीकांमुळेच देशाची प्रगती होते. म्हणून विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे.असे मत व्यक्त केले.
कवी प्रशांत केंदळे यांनी मार्गदर्शन करता करता आपल्या हास्यकवितांबरोबरच उद्बोधक कविता ऐकवून विद्यार्थ्यांना परीक्षेचे दडपण न घेता परीक्षेकडे संधी म्हणून पाहण्याचे व कवितांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच जीवनातील चांगल्या गुणांच्या वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यांनी जीवनात श्रमाचे महत्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुख्याध्यापक ए.वाय.हडस , स्कूल कमीटी उपाध्यक्ष सोपान रहाणे ,बाळासाहेब विधाते , सुरेश घुमरे , शंकर वाघ , दत्तात्रेय दाभाडे ,मधुकर घुमरे ,निवृत्ती घुमरे, दशरथ विधाते , माजी पंचायत समतिी सदस्य सुनिल घुमरे आदींसह ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील विद्यार्थीनी कु.दिपाली घुमरे व चैताली सुर्यवंशी यांनी तर आभार त्रिवेणी घुमरे हिने मानले. (०२ दिंडोरी१)