शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कॅम्पस लूक? ते काय असतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 16:50 IST

कॅम्पसमध्ये आपण करतो ती स्टाईल हे कायम लक्षात ठेवा; इतरांना कशाला फॉलो करता?

ठळक मुद्देफिटनेसची काळजी घ्या, वजनाची नाही.कॉलेजात जाताय ना? या वयात येणारच चेहर्यावर पिंपल्स.दिसण्याचे, वाढत्या वजनाचे, नकोसे लोड घेण्याची सवयच एकदाची सोडून देऊ.

-नेहा चढ्ढा

कॉलेज आता सुरु झालं. अ‍ॅडमिशनचा बहर ओसरला आणि कॉलेज रेग्युलर सुरु झालं की तो कॅम्पसचा माहौल हवाहवासा वाटू लागेल. आणि मग एकसेएक मुलंमुलं दिसू लागतील, फॅशनेबल. त्यांच्या स्टाईल्स. आणि आपल्याला कॉम्प्लेक्स. आपण दिसतो कसे? काहीजण हौशीनं नवे कपडे, नवा हेअरकट करुन घेतात. तरीही आपण स्टाईल आयकॉन नाही कॉलेजात असं वाटतंच. आणि मग अनेकांच्या डोक्यात होतो नुस्ता किचाट. वजन एक किलो जास्त असलं तरी  किती ती घालमेल. किती तो धडपडाट बारीक होण्याचा. आणि जे बारीक आहे त्यांचा जाडजुड होण्याचाही.

एक बटाटावडा खायचा, एखादं वेफर्स तोंडात टाकायचं तरी मनात केवढा गिल्ट की, काय हे किती अनहेल्दी खात सुटलोय आपण.

एखादाच येतो पिंपल चेहर्‍यावर, एखादीच पुळी.एखादाच पांढरा केस चमकायला लागतो केसात.

जरा एक शेड सावळा होतो रंग.

कधीतरी थोडी कोरडी होते स्किन .

कधीतरी भयानकच दिसतात केस, पिंजारलेले, अजिबात सेट न होता वार्‍यावर उडणारे.

आणि हे सगळं असं झालं की, आपण कमालीचे अस्वस्थ होतो.

ज्याला त्याला विचारतो, काय करू? काय केलं म्हणजे वजन चटकन कमी होईल? काय केलं म्हणजे केस पांढरे व्हायचे थांबतील? काय केलं म्हणजे एकही काळं वतरुळ नाहीच येणार डोळ्याखाली, एकही सुरकुती चेहर्‍यावर  पडणार नाही?

उत्तरं तर मिळत नाहीतच, पण मनस्ताप मात्र आपल्याला चिक्कार होतो.

आपल्याकडे काय खास आहे, हे राहतं बाजूलाच. गालावरचा एक पिंपल, वाढलेलं दोन किलो वजन तेवढं छळतं.!

कशाला एवढं जीवाला लावून घ्यायचं? सांगायचं स्वतर्‍ला की, इव्हन राऊण्ड इज अ शेप.

हवीये कोणाला झिरो फिगर, जमानाच गुटगुटीत असण्याच्या फॅशनचा आहे. आणि मुख्य म्हणजे फॅशन काही का असेना, आपण जे आहोत ते असे आहोत.

कितीही कमी खाल्लं तरी नाही ना होत चटकन वजन कमी, मग त्यासाठी उगाच झुरत बसायचं नाही.

कितीही क्रीम लावले तरी येतात ना चेहर्‍यावर एक-दोन पिंपल्स तर येतातच, जसे येतात तसे जातीलही, त्यांचे त्यांचे त्यांना काही मी फार भाव नाही देणार.

मुळात दिसण्यालाच मी फार भाव नाही देत बसणार.

म्हणजे प्रेझेटेबल असणं असतं महत्वाचं, पण सतत इतरांच्या नजरेनं स्वतर्‍कडं पहाण्याची सवयच मी सोडून मी देईन.

‘चालतं, एवढं काही हायपर व्हायची गरज नाही’ असं स्वतर्‍ला सांगितलं आणि आपण जसे दिसतो तसं कॅरी केलं की सुटते ही सवय हळूहळू.

मग कशाला लोड घ्यायचा.

मुद्दा काय, मनात आणलं तर हे दिसण्याचे, वाढत्या वजनाचे, नकोसे लोड घेण्याची सवयच एकदाची सोडून देऊ.

मस्त चिल करू.!