शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पाषाणशाळांविषयी शासनाची अनास्था २ वर्षापासून भेट अहवाल धूळखात

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

समिती गठित करूनही अहवालावर कार्यवाही नाही

समिती गठित करूनही अहवालावर कार्यवाही नाही
पुणे :दगडखाण क्षेत्रातील पाषाणशाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी नेमण्यात आलेल्या शासकीय अभ्यास समितीचा भेट अहवाल शासनदराबारी दोन वर्षापासून धूळखात पडला आहे. समितीच्या सदस्यांनी दिलेल्या शिफारसींचा कच्चा मसूदा तयार करून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडे २०१३ मध्येच सादर करण्यात आला आहे. मात्र अद्याप परिषदेने समितीची दखल घेत साधी बैठकही घेतलेली नाही तर शासनर्णिय कधी घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे शासनानेच गठित केलेल्या या समितीच्या अध्यक्ष व सचिवांनीच दगडखाणीच्या व पाषाण शाळेला एकदा ही भेट दिलेली नाही. यावरूनच शासकीय अधिकार्‍यांची अनास्था स्पष्ट होत असली तरी याचा परिणाम पाषाण शाळेतील विद्यार्थ्यांवर होत आहे.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत दगडखाण क्षेत्रातील मुलांच्या शिक्षणाबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी शासनाने १ डिसेंबर २०१२ रोजी ९ सदस्यीय अभ्यास समिती जाहीर केली. या समितीने काही ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन २ महिन्यांच्या आत शासनाकडे अहवाल सादर करणे अपेक्षित होते. यानंतर या समितीने ऑक्टोबर २०१३ मध्ये पुण्यातील २२ पाषाण शाळांपैकी २० पाषाणशाळा व दगडखाण शाळांना भेटी दिल्या. या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता व पायाभूत सुविदा वाढव्यात यासाठी त्यांनी पाहणी करून प्रत्येक सदस्यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडे अहवाल सादर केला. या अहवालावरून परिषदेने शिफारसींचा कच्चा अहवाल सादर केला. मात्र यावर पुढे कोणतेच पाऊल उचलले नाही.
याविषयी समितीतील सदस्य व संतुलन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बस्तु रेगे म्हणाले, दगडखाण मुलांच्या शिक्षणात सुधारणा व्हाव्यात म्हणून २०१२ मध्ये शासन निर्णय जाहीर करून शासकीय समिती गठीत करण्यात आली होती. मात्र समितीच्या भेटींच्या अहवालानंतर, त्यांनी मांडलेल्या शिफारसींसाठी एकही बैठक झाली नाही. याऊलट समितीचे अध्यक्ष असणारे राज्य प्रकल्प संचालक व सचिव असणारे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे सहसंचालक यांनी एकाही दगडखाण शाळेला भेट दिलेली नाही. त्यामुळे समितीच्या अध्यक्ष व सचिवांना हा प्रश्न सोडविण्याविषयीची अनास्था स्पष्ट होते. मागील दोन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहोत मात्र दाद मिळत नाही. टोलवाटोलवीची उत्तरे मिळतात. मागील वर्षभर राज्य प्रकल्पसंचालक हे प्रभारी होते. मात्र आता पूर्णवेळ संचालक येऊनही काम जैसे थे आहे.
चौकट

समितीने केलेल्या शिफारसींवर शासनाने तातडीने निर्णय घेऊन पाषाण शाळांना विश्ेाष बाबीअंतर्गत मान्यता मिळावी अन्यथा मुंबई येथे २ ऑक्टोबर २०१५ पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दगडखाण कामगार परिषद व पाषाण शाळा शिक्षक संघाच्यावतीने बस्तु रेगे यांनी दिला.