शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईग्रस्त गावातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ होणार शिक्षण : खान्देशातील २७५७ गावातील विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा

By admin | Updated: February 10, 2016 00:32 IST

जळगाव : शासन निर्णयानुसार खान्देशातील २ हजार ७५७ टंचाईग्रस्त गावातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करावे, असे पत्र उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. केशव तुपे यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. ए. एम. महाजन यांना दिले आहे.

जळगाव : शासन निर्णयानुसार खान्देशातील २ हजार ७५७ टंचाईग्रस्त गावातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करावे, असे पत्र उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. केशव तुपे यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. ए. एम. महाजन यांना दिले आहे. यंदा खान्देशात दुष्काळी परिस्थिती आहे. २०१५-२०१६ चा खरीप हंगाम ५० पैशापेक्षा कमी आहे. महसूल व वन विभागाच्या २० ऑक्टोबरला शासन निर्णयानुसार ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी घोषित केलेल्या गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक परीक्षा शुल्क माफ करावे, असे म्हटले आहे. याबाबत काही दिवसांपर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठावर मोर्चा नेत खरीप हंगामात ५० पैसे आणेवारी असलेल्या गावातील विद्यार्थ्यांची फी माफ करण्याचे सांगितले होते. त्याची दखल घेत, सहसंचालक डॉ. तुपे यांनी कुलसचिवांना पत्र लिहिले आहे. खान्देशातील दुष्काळी गावांची संख्या अशी : जळगाव- १२५८धुळे-६१४नंदुरबार- ८८५ शासन निर्णयानुसार विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांमध्ये दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थी शिक्षण घेत असतील, तर त्यांचे शैक्षणिक परीक्षा शुल्क माफ करण्याचे पत्राद्वारे विद्यापीठाला कळविण्यात आले आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे सूचित करण्यात आले आहे. - डॉ. केशव तुपे, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग