शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.शिंदे

By admin | Updated: June 17, 2015 01:33 IST

शिवाजी विद्यापीठाच्या

शिवाजी विद्यापीठाच्या
कुलगुरुपदी डॉ.शिंदे
मुंबई - कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ.देवानंद बाबूराव शिंदे यांची आज राज्यपाल तथा कुलपती सी.विद्यासागर राव यांनी नियुक्ती केली.
डॉ.शिंदे हे सध्या औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रसायनशास्र विभागाचे प्राध्यापक तसेच प्रगत संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक आहेत.
६ फेब्रुवारी १९६३ रोजी जन्मलेले डॉ.शिंदे यांना शिक्षण, संशोधन व प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे. मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्रात एमएस्सी, पीएचडी प्राप्त केली आहे. डॉ.शिंदे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे रिसर्च फेलो होते. डिसेंबर २००५ पासून ते औरंगाबादला विद्यापीठाच्या रसायनशास्र विभागात प्राध्यापक आहेत. औषधीय रसायनशास्र, ड्रग डिझाईन व औषधीशास्र विश्लेषण या विषयांत त्यांना विशेष रुची आहे.
डॉ.एन.जे.पवार यांचा शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा कार्यकाळ २६ फेब्रुवारी २०१५ रोजी संपल्यानंतर डॉ.अशोक भोईटे हे प्रभारी कुलगुरु म्हणून काम पाहत होते. नव्या कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती के.एस.राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक शोध समिती नेमली होती. समितीने शिफारस केलेल्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती राज्यपालांनी घेतल्या होत्या. त्यानंतर डॉ.शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)