शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

समाजकार्य करताना पदाची आशा करू नये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 02:40 IST

गोरेगाव येथील नागरी निवारा परिषदमध्ये राहणारा अभिषेक घोगरे याची युवा समाजकार्यकर्ता म्हणून ओळख आहे. सध्या तो साठ्ये महाविद्यालय, युवासेना युनिटचा उपाध्यक्ष आहे.

गोरेगाव येथील नागरी निवारा परिषदमध्ये राहणारा अभिषेक घोगरे याची युवा समाजकार्यकर्ता म्हणून ओळख आहे. सध्या तो साठ्ये महाविद्यालय, युवासेना युनिटचा उपाध्यक्ष आहे. त्याने साठ्ये महाविद्यालयात बीएमएमचे शिक्षण घेतले असून, यंदा त्याने टीवायची परीक्षा दिली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता जोतिषशास्त्राचा अभ्यासही तो करतो. शाळेत असल्यापासून त्याला समाजकार्यांची आवड.महाविद्यालयीन शिक्षण सुरु झाल्यावर गोरेगाव ते विलेपार्ले असा वर्षांचा प्रवास सुरु झाला. प्रवासात त्याला अनेक समस्या दिसू लागल्या. त्यातून समाजकार्य करण्याची इच्छा जागृत झाली. महाविद्यालयीन प्रश्न सोडवण्यापासून झाली. तसेच शेजारी राहणाऱ्यांना आरोग्यविषयी अडचणी असल्यास वैद्यकीय मदत करणे, शासकीय रुग्णालयात उपचार उपलब्ध करुन देणे, मैदानी खेळाचे आयोजन करुन तरुण प्रोत्साहन देणे, अशी कामे तो करतो. त्याला समाजकार्यांबरोबर चांगल्या ठिकाणी फिरायला आवडते. तसेच त्याला कबड्डीचीही आवड आहे.अभिषेक सांगतो, कॉलेजमध्ये थोडा फेमस झाल्यावर चांगले आणि वाईट असे दोन्ही अनुभव आले. आपण काय बोलावे? काय बोलू नये? याचा विचार करून जबाबदारीने कसे वागावे हे शिकलो. काही चुकीचे घडल्यास त्यावर प्रतिक्रिया दिल्यास मित्रांमध्ये गैरसमज व्हायचा. समाजकार्यामुळे मला नेते, साहेब या नावाने कॉलेजमधील मित्र-मैत्रिणी बोलू लागली; परंतु समाजकार्य करताना अनेक वाईट अनुभव आले. मात्र, यातून खचून न जाता आयुष्यभर समाजकार्य करण्याची जिद्द अंगी निर्माण झाली आहे.आजच्या तरुणपिढीला अभिषेक सांगतो की, शिक्षण महत्वाचे आहे. शिक्षण असेल तर समाजकार्याचे महत्त्व समजते. समाजात काही चुकीचे होत असेल किंवा घडत असेल, तर त्याला वाचा फोडणे गरजेचे आहे. समाजकार्य करताना पदाची आशा करू नये. समाजाच्या हितासाठी सदैव काम करावे आणि करत राहावे.शब्दांकन - सागर नेवरेकर