शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

१२५ व्याख्यानातून मिळणार बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना उजाळा

By admin | Updated: January 24, 2016 22:19 IST

जळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संलग्नित १२५ महाविद्यालयांमध्ये व्याख्यानाचे आयोजन करावे, असे आदेश विद्यार्थी कल्याण विभागातर्फे देण्यात आले आहे. या उपक्रमामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा मिळणार आहे.

जळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संलग्नित १२५ महाविद्यालयांमध्ये व्याख्यानाचे आयोजन करावे, असे आदेश विद्यार्थी कल्याण विभागातर्फे देण्यात आले आहे. या उपक्रमामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा मिळणार आहे.
हा उपक्रम राबविण्यासाठी विद्यार्थी कल्याण विभागातर्फे संबंधित १२५ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्राद्वारे सूचित करण्यात आले असून तसे नियोजन तत्काळ करण्याची सूचना महाविद्यालयांना देण्यात आली आहे.
३१ मार्चपर्यंत अहवाल द्यावा लागणार
व्याख्यानाचा कार्यक्रम व त्यासंबंधी पाच फोटो हे ३१ मार्चपर्यंत विद्यार्थी कल्याण विभागाकडे सादर करावे, असे महाविद्यालयांना कळविण्यात आले आहे. तसेच या अहवालासोबत ज्या मान्यवरांना व्याख्यानासाठी बोलविण्यात आले आहे, त्याच्या भाषणाचा सारांशही देण्याचे महाविद्यालयांना सांगण्यात आले आहे.
१ हजार रुपये मानधन
हा उपक्रम राबविण्याासाठी व्याख्यानासाठी आलेल्या मान्यवरांना १ हजार रुपये दिले जाणार आहे. ते मानधन विद्यापीठातर्फे दिले जाणार आहे. तसेच या कार्यक्रमावर होणारा इतर खर्च हा महाविद्यालयांना करावा लागणार आहे.
तज्ज्ञ व्यक्तींना द्यावे निमंत्रण
व्याख्यानासाठी जाणकार, तज्ज्ञ व्यक्तींना निमंत्रण द्यावे, असे सूचित करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्याचा परिचय व अभ्यास असलेल्या मान्यवरांनाच व्याख्यानासाठी बोलवावे, असे महाविद्यालयांना कळविण्यात आले आहे.