शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ेशाळा महाविद्यालय

By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST

संस्कार विद्या मंदिर

संस्कार विद्या मंदिर
नागपूर : संस्कार विद्या मंदिर शाळेत हेड बॉय अणि हेड गर्लची निवडणूक पार पडली. याशिवाय विविध वर्गांच्या प्रमुख विद्यार्थ्यांची निवड याप्रसंगी करण्यात आली. शाळेचे व्यवस्थापकीय संचालक कामथ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना त्यांचे काम समजावून सांगितले. शाळेत शिस्त राहावी म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले. कार्तिकेय कायलकर याची हेड बॉय म्हणून निवड करण्यात आली. श्रुती कुंभारे हेड गर्ल म्हणून निवडण्यात आली. अक्षय क्षेत्रपाल आणि सायली वासू यांना सांस्कृतिक मंत्री म्हणून निवडण्यात आले. स्वर्णिल कुकडे क्रीडा मंत्री म्हणून निवडण्यात आला. तर प्रत्येक वर्गाचा कप्तान आणि उपकप्तान यावेळी कामथ यांच्या मार्गदर्शनाखाली निवडण्यात आला.
------
नायर इसेन्स इंटरनॅशनल स्कूल
नागपूर : केवळ पुस्तकी शिक्षण घेणे म्हणजे शिक्षण नसून संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास हाच खरा विकास असल्याचे मत आसावरी शेणोलीकर यांनी व्यक्त केले. नायर इसेन्स स्कूलच्या विज्ञान प्रदर्शनाचे आणि ग्रंथालयाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शुभांगी पिंगळे, डॉ. श्यामकांत पडोळे, डॉ. बांद्रे उपस्थित होते. ग्रंथालयासाठी जयश्री नायर, हेमा मेनन आणि प्राचार्या बीना मेनन यांनी परिश्रम घेतले. शाळेतर्फे आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनातील वैज्ञानिक मॉडेल्सचे परीक्षण पडोळे, इंगळे यांनी केले. या प्रदर्शनातून आजचे आधुनिक जग दिसत असल्याची प्रतिक्रिया पडोळे यांनी व्यक्त केली. प्रदर्शनात प्रथम पारितोषिक नारायणा विद्यालय, द्वितीय भवन्स, सिव्हील लाईन्स आणि तृतीय सेंट झेव्हियर हायस्कूल, हिंगणा यांना देण्यात आले. ब गटात सांदीपनी स्कूल, सेंटर पॉईंट स्कूल, भवन्स, सिव्हील लाईन्स यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. चॅम्पियन म्हणून सांदीपनी स्कूल, हजारी पहाड तर उपविजेता नारायणा विद्यालय ठरले.