अर्थसंकल्प बातमीला जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 00:05 IST
नवीन अभ्यासक्रम सुरू होणार
अर्थसंकल्प बातमीला जोड
नवीन अभ्यासक्रम सुरू होणारविद्यापीठात स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ अंतर्गत सहा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास तसेच विद्यापीठात विधी प्रयोगशाळेंतर्गत तीन नवीन पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यास अधिसभेत मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे वोस्लॉ तंत्रज्ञान विद्यापीठ, पोलंड आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात होणार्या सामंजस्य कराराच्या मसुद्याला अधिसभेत सहमती दर्शवण्यात आली.विशेष समितीचे गठणविद्यापीठाच्या अधिक्षेत्रातील तीन जिल्ात विद्यापीठाकडून निित करण्यात येणारे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि ॲक्सिडेंट हॉस्पिटल यांनी विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरवावी, अशी योजना आखण्यास अधिसभेने मान्यता दिली. या योजनेचे सविस्तर प्रारूप व नियमावली तयार करण्यासाठी विशेष समितीचे गठण करण्यात आले.संशोधकांसाठी विशेष प्रोत्साहन योजनासंशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी यंदा कुलगुरू पेटंट प्रोत्साहन योजना (व्हीसीपीएमएस) नव्याने सुरू करण्यात येत असून आर्थिक वर्ष २०१६-१७ अंतर्गत या योजनेसाठी २५ लाखांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली. तसेच कुलगुरू संशोधन प्रोत्साहन योजनेसाठीदेखील ५० लाखांची तरतूद केली आहे.वीज बचतीसाठी पुढाकारविद्यापीठाकडून सौर ऊर्जेबाबत विविध पथदर्शी प्रकल्प राबवले जात आहेत. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिसरणतर्फे विद्यापीठाला मिळालेल्या २५ लाख रुपयांच्या अनुदानातून यापूर्वी २१२ एलइडी पथदिवे लावण्यात आले आहेत. विद्यापीठात ५०० कि.वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे प्रस्ताव सादर केला आहे.अधिसभेला यांची होती उपस्थितीकुलसचिव प्रा.ए.एम. महाजन, प्रा.डी.जी. हुंडीवाले, प्रा.सत्यजित साळवे, डॉ.तुकाराम बोरसे, प्रा.अमुलराव बोरसे, डॉ.भारत कर्हाड, प्रा.विजय माहेश्वरी, प्रा.राकेशकुमार रामटेके, प्रा.रवींद्र कुलकर्णी, अरूण सपकाळे यांची अधिसभेला उपस्थिती होती. उपस्थित सदस्यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत करून तो संतुलित व विकासाभिमुख असल्याचे मत मांडले. दरम्यान, विद्यार्थी हिताच्या दृष्टीने विद्यापीठाचा अर्थसंकल्प महत्त्वाचा असतो. असे असताना अधिसभेचे सदस्य असणार्या लोकप्रतिनिधींनी मात्र, अर्थसंकल्पाच्या बैठकीला दांडी मारली.अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर कुलगुरू प्रा.सुधीर मेश्राम यांनी विद्यापीठाच्या विकासासाठी सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली. कुलसचिव प्रा.ए.एम. महाजन यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.