शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

प्राणिसंग्रहालयाचे तिकीट ५ पट महागले

By admin | Updated: February 19, 2016 00:02 IST

औरंगाबाद : उत्पन्नवाढीसाठी महानगरपालिकेने गुरुवारी सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेश शुल्कात जबर वाढ केली. प्रशासनाने मांडलेला दरवाढीचा ठराव स्थायी समितीने किंचित बदलांसह मंजूर केला.

औरंगाबाद : उत्पन्नवाढीसाठी महानगरपालिकेने गुरुवारी सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेश शुल्कात जबर वाढ केली. प्रशासनाने मांडलेला दरवाढीचा ठराव स्थायी समितीने किंचित बदलांसह मंजूर केला. त्यानुसार उद्यानाच्या तिकिटात दुप्पट आणि प्राणिसंग्रहालयाच्या दरात तब्बल पाचपट वाढ करण्यात आली आहे. आता मोठ्यांसाठी उद्यानाचे तिकीट दहा रुपयांवरून वीस रुपये आणि प्राणिसंग्रहालयाचे तिकीट १० रुपयांवरून थेट पन्नास रुपये करण्यात आले आहे.मनपा प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत दरवाढीचा प्रस्ताव ठेवला होता. त्यात उद्यानाचे तिकीट प्रौढांसाठी दहावरून तीस रुपये आणि लहान मुलांकरिता पाचवरून १५ रुपये करण्याची शिफारस केली होती. त्याप्रमाणे प्राणिसंग्रहालयाचे तिकीटही प्रौढांकरिता दहावरून शंभर रुपये आणि लहान मुलांसाठी पाचवरून ५० रुपये करण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. त्याला स्थायी समितीच्या बहुसंख्य सदस्यांनी सुरुवातीला आक्षेप घेतला. प्रशासनाने सुचविलेली दरवाढ खूपच जास्त असल्याचा आक्षेप एमआयएमचे नगरसेवक विकास एडके, अब्दुल नाईकवाडी, समिना शेख, शिवसेनेचे गजानन मनगटे, मकरंद कुलकर्णी, शहर विकास आघाडीचे गजानन बारवाल, भाजपचे नितीन चित्ते यांनी घेतला. यानंतर सभापती दिलीप थोरात यांनी दरवाढीच्या आवश्यकतेविषयी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. नाईकवाडे आणि आयुक्त म्हणून सभागृहात उपस्थित असलेले अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्याकडे विचारणा केली. त्यावर प्राणिसंग्रहालयाचे अद्ययावतीकरण करणे गरजेचे असून त्यासाठी सुमारे ३० कोटी रुपये खर्च येणार आहे. सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता मनपाला हा खर्च करणे शक्य नाही. म्हणून उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या तिकीट दरात वाढ करणे आवश्यक आहे, असा खुलासा रमेश पवार आणि नाईकवाडे यांनी केला. त्यावर सखोल चर्चा झाल्यावर सदस्यांनीही दरवाढीस संमती दिली. मात्र, प्रशासनाने सुचविलेली दरवाढ अवास्तव असल्याचे मतही मांडले. उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात गरिबांना येणे परवडेल अशीच दरवाढ असावी, अशी विनंती या सदस्यांनी सभापतींकडे केली. त्यानंतर सभापती थोरात यांनी सदस्यांच्या संमतीने उद्यानाच्या तिकीट दरात दुपटीने, तर प्राणिसंग्रहालयाच्या तिकीट दरात दहापटींऐवजी पाचपट वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला.