शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

वडवणी तालुक्यात शून्य टक्के चारा

By admin | Updated: May 5, 2016 00:13 IST

वडवणी : तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी भयावह दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. तालुक्यातील पाण्याचे

वडवणी : तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी भयावह दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. तालुक्यातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने व भूर्गभातील पाणीपातळी खालवल्याने पाण्याच्या शोधात रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. नागरिकांच्या घशाला कोरड पडत असताना जनावरांना दुष्काळी परिस्थितीचा मोठा सामना करावा लागत आहे. एप्रिल अखेर तालुक्यात शून्य टक्के चारा असल्याने ग्रामीण भागातील जनावरांचा चारा प्रश्न गंभीर बनला आहे. वडवणी तालुक्यात ६५ हजार ७६ जनावरे असून, गाय प्रवर्गात १८ हजार १८७ तर म्हैस प्रवर्गात ७ हजार ५६६, शेळ्या ११ हजार ४९३, तर मेंढ्या, घोडे, कोंबड्या, कुत्रे, डुकरे असे एकूण ७५ हजार ७५ एवढी जनावरे आहेत. तालुक्यातील दुभत्या जनावरांना हिरवा चारा उपलब्ध नसल्यामुळे दुधव्यवसाय ही धोक्यात आहे. तालुक्यात फक्त तीन ठिकाणी जनावरांच्या छावण्या आहेत. देवळा येथे लहान ८१ तर मोठे ११५३ असे १२३४ जनावरे असून, पुसरा येथील चारा छावणीत लहान ६४ तर मोठे ७२० असे एकूण ७८४ जनावरे आहेत. वडवणी शहरातील चारा छावणीत लहान ३२ व मोठे ८४४ अशी ८७६ जनावरे आहेत. शेतकरी दुष्काळी परिस्थितीमुळे हतबल झाले असून, चारा प्रश्न व पाणीटंचाईचा सामना यामुळे शेतकरी जनावरांना कवडीमोल किंमतीत विक्री काढत आहेत.तालुका कृषी अधिकारी बी. बी. बांगर म्हणाले की, तालुक्यातील चारा हा एप्रिल महिन्यात संपला असून, तालुक्यातील जनावरांना आता छावणीत चारा देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. (वार्ताहर)चाराप्रश्न गंभीर : २८९४ जनावरे छावणीतवडवणी तालुक्यातील जनावरांचा चारा प्रश्न सोडविण्यासाठी ३ छावण्या उभारण्यात आल्या मात्र एकूण २५ हजार ७५३ मोठ्या जनावरांपैकी फक्त २ हजार ८९४ जनावरांचा छावणीत मुक्काम असून २२ हजार ८५९ जनावरांचा चारा प्रश्न गंभीर बनला आहे.