शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. शाळांवर टंचाईचे संकट

By admin | Updated: March 4, 2016 23:37 IST

परभणी : जिल्ह्यात बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या पाणीटंचाईचा फटका जिल्हा परिषद शाळांनाही बसला आहे.

परभणी : जिल्ह्यात बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या पाणीटंचाईचा फटका जिल्हा परिषद शाळांनाही बसला आहे. जिल्ह्यातील निम्म्या जि. प. शाळांमध्ये पाणी उपलब्ध नसल्याने मध्यान्ह भोजन योजनेवर परिणाम होत आहे.जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १ हजार १४८ प्राथमिक शाळा असून ३६६ खाजगी अनुदानित, ४५६ विना अनुदानित अशा १ हजार ९७१ शाळा आहेत. त्यापैकी शासकीय ९९४, खाजगी अनुदानित ३६६ तर ४५३ खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये युडायसनुसार पाणी उपलब्ध करुन दिलेले आहे. परंतु, जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याचा फटका या शाळांनाही बसत आहे. जिल्ह्यातील पाणीपातळी खालावल्यामुळे शाळांमधील बोअर, हातपंप कोरडेठाक पडले आहेत. गावातच पाणीटंचाई निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांनाही पाण्यासाठी भटकावे लागत आहे. त्यामुळे शाळांमध्येही पाणी कोठून आणायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. किती शाळांना पाणीटंचाईचा फटका बसला याची आकडेवारी शिक्षण विभागाकडे उपलब्ध नाही़ शिवाय जिल्हा परिषद शाळांमध्ये पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वेगळा फंड नसल्याने कोणत्या फंडातून पाणी उपलब्ध करून द्यायचे? असा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनास पडला आहे़ त्यामुळे शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांच्यामार्फतच शाळांमध्ये पाणी उपलब्ध करुन द्यावे लागणार आहे. जिल्ह्यातील पाणी टंचाईची भीषणता लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या परीक्षा लवकर घेण्यासंदर्भातही जिल्हा शिक्षण विभागात चर्चा सुरू आहे़ (प्रतिनिधी)