शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

जि.प. सीईओंच्या खुर्ची, साहित्यावर जप्तीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:02 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषद सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) मधुकर आर्दड यांची खुर्ची व इतर साहित्य जप्त करण्याची कारवाई मंगळवारी कोर्ट आदेशानुसार करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषद सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) मधुकर आर्दड यांची खुर्ची व इतर साहित्य जप्त करण्याची कारवाई मंगळवारी कोर्ट आदेशानुसार करण्यात आली. सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील जि. प. शाळा बांधकामाचे ४३ लाख १७ हजार ६० रुपयांचे बिल थकविल्यामुळे जि. प. प्रशासनावर ही नामुष्की ओढवली. या प्रकरणामागील घटनाक्रमही मोठा रंजक आहे. १९८८ साली पी. ए. चोपडा या कंत्राटदाराने अंधारीतील शाळा बांधण्याचे कंत्राट घेतले. १९९२ साली ती शाळा बांधून पूर्ण झाली; परंतु कंत्राटदाराला बिल देण्यासाठी तत्कालीन जि. प. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी टाळाटाळ केली. तेव्हापासून आजपर्यंत चोपडा यांनी वेगवेगळ्या मार्गाने लढा देत जि.प.कडे बिल मागण्यासाठी तगादा लावला; परंतु जि.प.ने त्यांना बिल अदा केले नाही. अखेर त्यांनी सिव्हिल कोर्टात धाव घेतल्यानंतर कोर्टाने जप्तीचे आदेश जारी केले. त्यानुसार कोर्ट बेलिफ बऱ्हाणपुरे यांनी मंगळवारी जिल्हा परिषद सीईआेंचे वाहन व खुर्चीसह साहित्य जप्तीसाठी कारवाई सुरू केली; परंतु सीईओ तेथे नसल्यामुळे सकाळी ११ वाजेच्या कारवाईला सायंकाळी ४ वाजले. खुर्ची व साहित्याला नोटीस चिकटवून ते साहित्य जप्त करण्यात आले.