शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
2
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
3
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
5
पोस्टाची 'ही' स्कीम हलक्यात घेऊ नका; थोडी थोडी गुंतवणूक करून जमवू शकता १७ लाखांचा फंड
6
खळबळजनक! HIV पॉझिटिव्ह अन् कर्जबाजारी होता भाऊ; रक्षाबंधनाच्या आधी बहीण झाली निष्ठूर
7
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
8
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
9
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
10
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य
11
शिवानी सोनारने घरी आणली Tata कंपनीची नवी कोरी कार, गाडीची किंमत माहितीये?
12
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
13
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
14
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
15
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
16
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
17
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
18
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
19
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार

जि.प. शाळाखोल्या बांधकाम; दुरुस्ती घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:35 IST

जिल्हा परिषदेतील प्राथमिक आणि माध्यमिक शाळाखोल्यांचे बांधकाम आणि दुरुस्तीमध्ये कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी २०१६ मध्ये क्रांतीचौक पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सोमवारी घेतला. या गुन्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे तत्कालीन दोन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अन्य अधिकारी आहेत.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांचे आदेश : तीन वर्षांपूर्वी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात दाखल झाला होता गुन्हा

औरंगाबाद : जिल्हा परिषदेतील प्राथमिक आणि माध्यमिक शाळाखोल्यांचे बांधकाम आणि दुरुस्तीमध्ये कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी २०१६ मध्ये क्रांतीचौक पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सोमवारी घेतला. या गुन्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे तत्कालीन दोन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अन्य अधिकारी आहेत.तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित चौधरी, तत्कालीन शिक्षण अधिकारी नितीन उपासणी, जि.प. बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता भारत बाविस्कर, लेखाधिकारी विलास जाधव यांचा आरोपीमध्ये समावेश आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगर येथील एका साप्ताहिकाचे संपादक रऊफ न्याजू पटेल यांनी जिल्हा परिषद शाळाखोल्या बांधकाम आणि दुरुस्तीमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात केली होती. न्यायालयाच्या आदेशाने १६ मार्च २०१६ रोजी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात याविषयी भादंवि कलम ४०६, ४०९, ४६७, ४७१, १२०(ब) आणि ३४ अन्वये गुन्हा नोंद झाला होता. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता. नंतर त्यांची बदली झाल्याने हा तपास थांबला. याबाबत माहिती मिळताच, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी या गुन्ह्याचे गांभीर्य आणि आरोपींमध्ये दोन आयएएस दर्जाचे अधिकारी असल्याने गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेने करावा, असे आदेश दिले. त्यानुसार क्रांतीचौक पोलिसांकडून या गुन्ह्यासंबंधी सर्व कागदपत्रे सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेला प्राप्त झाले. पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले, उपनिरीक्षक सुभाष खंडागळे यांनी तपास सुरू केला.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी