शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. जागांचे होणार पुनर्मूल्यांकन !

By admin | Updated: April 11, 2017 00:10 IST

लातूरजिल्हा परिषदेत भाजपाने आपली सत्ता स्थापन केल्यानंतर नवे फर्मान सोडत जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागांचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत

हरी मोकाशे  लातूरजिल्हा परिषदेत भाजपाने आपली सत्ता स्थापन केल्यानंतर नवे फर्मान सोडत जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागांचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे सत्ताधारी सांगत असले तरी करार पद्धतीने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या ताब्यात असलेल्या जिल्हा परिषदेच्या जागांची माहिती त्यातून मिळवायची आहे. तसेच आजच्या दराच्या तुलनेनुसार भाडे मिळत आहे की नाही, हेही जाणून घेतले जाणार आहे. परिणामी, पुनर्मूल्यांकन होण्याबरोबर भाडे दरात वाढ होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.लातूर जिल्ह्याची निर्मिती १९८२ साली झाली. तत्पूर्वी लातूर जिल्हा हा उस्मानाबाद जिल्ह्याअंतर्गत होता. जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत काँग्रेसची जिल्हा परिषदेवर सत्ता राहिली आहे. परंतु, यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाने काँग्रेस व राष्ट्रवादीचा पराभव करून सत्ता काबीज केली आहे. दरम्यान, सत्तेवर विराजमान होताच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे व उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी जिल्हा परिषद प्रशासनास आपल्या ताब्यातील जागा व इमारतीचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहेत. जि.प. मालकीच्या इमारती व जागा करार पद्धतीने स्वयंसेवी संस्था, शाळा-महाविद्यालयांना भाडे तत्त्वावर देण्यात आल्या आहेत. वास्तविक पाहता आजपर्यंत काँग्रेसची जिल्हा परिषदेवर सत्ता राहिल्याने जिल्हा परिषदेच्या ताब्यातील इमारती व जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या संस्थांच्या ताब्यात करार पद्धतीने अल्पदरात असल्याचे जिल्हा परिषदेतील सूत्रांनी सांगितले.