शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.३, पं.स.चे ११ अर्ज बाद

By admin | Updated: February 3, 2017 00:36 IST

बीड : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांची छानणी प्रक्रिया गुरूवारी पूर्ण झाली.

बीड  : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांची छानणी प्रक्रिया गुरूवारी पूर्ण झाली. विविध त्रुटींमुळे जि. प. चे ३, तर पं. स. चे ११ अर्ज बाद झाले. अंबाजोगाई, शिरूर कासार, गेवराईमध्ये जि. प. चे सर्व अर्ज वैध ठरले असून, काही ठिकाणी आक्षेप आल्याने निर्णय राखून ठेवण्यात आला आहे.बीड तालुक्यातील ८ गटांसाठी १५५, तर पं. स. च्या १६ गणांसाठी २८२ नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. त्यापैकी जि.प.चे २, तर पंचायत समितीचे ३ असे एकूण ५ अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवले. जिल्हा परिषदेसाठी चौसाळा गटातील महेंद्र बोराडे व लिंबागणेश गटातील निकिता स्वप्नील गलधर यांचे अर्ज अवैध ठरले. पाली गणातील देवकर पिराजी, बहिरवाडी गणातील रशीदा बेगम, शेख फराह बेगम यांचे उमेदवारी अर्जही बाद ठरले.आष्टीत ३ अर्ज अवैधआष्टीमध्ये ३ उमेदवारी अर्ज अवैध ठरले. जिल्हा परिषदेसाठी आलेल्या ५९ अर्जांपैकी कडा गटातील ज्ञानेश्वर चौधरी यांचा अर्ज अवैध ठरला, तर लोणी गणातील संध्याराणी पांडूळे, चंद्रकांत करडळे, अजित गिरे यांचे अर्ज अवैध ठरले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रामेश्वर गोरे यांनी सांगितले.गेवराईत जि. प. चा एकही अर्ज अवैध नाहीगेवराई तालुक्यात ९ गटांसाठी ९७ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, यातील सर्व अर्ज वैध ठरले. १८ गणांसाठी १७७ जणांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी आंतरवली गणातून किश्किंदा राधाकिसन शिंदे यांचा एकमेव अर्ज सूचक गणाबाहेरील असल्याने अवैध ठरला आहे.अंबाजोगाई पं. स.च्या२ उमेदवारांचे अर्ज बादजिल्हा परिषदेच्या सहा गटासाठी ७३ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत, तर पंचायत समितीच्या बारा गणांसाठी १२७ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले.जिल्हा परिषदेच्या सहा गटासाठी ७३ उमेदवारांचे ७९ उमेदवारी अर्ज दाखल झाल होते. तर पंचायत समितीच्या १२ गणांसाठी १३० उमेदवारांचे १५२ उमेदवारी अर्ज दाखल झाल होते. आज झालेल्या छाननी प्रक्रियेत जिल्हा परिषद उमेदवारांचे ७३ अर्ज वैध ठरले. तर पंचायत समितीच्या २ उमेदवारांचे अर्ज बाद झाले, तर एका अर्जावरील आक्षेपाचा निर्णय प्रलंबित ठेवला आहे. जवळगाव गणातील पांडुरंग संतराम दहिवाडे यांनी उमेदवारी अर्जासोबत शौचालय घोषणापत्र न जोडल्याने त्यांचा अर्ज बाद ठरला.तर जवळगाव गणातीलच बंडू विश्वनाथ उदार यांनी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी सादर केल्याची पावती न जोडल्याने त्यांचा अर्ज बाद ठरला. तर चनई गणातील सतीश महीपती केंद्रे यांच्या उमेदवारी अर्जावर त्यांना तीन आपत्ये असल्याच्या आक्षेप नोंदविण्यात आला आहे. या अर्जावरील निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे.शिरूरमध्ये पं. स. चे २ अर्ज बादयेथे जि. प. चे सर्व अर्ज वैध ठरले. पं. स. चे २ अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. रायमोहा, पाडळी गणातून प्रत्येकी एक अर्ज बाद ठरला आहे.पाटोदा, माजलगावातउशिरापर्यंत छानणीमाजलगाव व पाटोदा तालुक्यात गुरूवारी रात्री उशिरापर्यंत अर्ज छानणीचे काम सुरू होते. माजलगावात ६ गट व १२ गण तर पाटोद्यात ३ गट व ६ गण आहेत. (प्रतिनिधी)