शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचा कार्यकाळ विसरूच शकत नाही

By admin | Updated: June 28, 2016 00:51 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषदेत जवळपास दीड वर्ष मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या कार्यकाळात बरेच काही शिकता आले.

औरंगाबाद : जिल्हा परिषदेत जवळपास दीड वर्ष मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या कार्यकाळात बरेच काही शिकता आले. विशेष म्हणजे आपल्या कार्यकाळात राबविण्यात आलेली ‘मेगा भरती’ ही अत्यंत नियोजनबद्ध आणि सुरळीत झाली. गावभेटींचा अनोखा उपक्रम यशस्वी राहिला. याशिवाय अन्य शासकीय सेवेत शिकता आले नसते ते इथे आपणास शिकता आले, असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी व्यक्त केले. डॉ. अभिजित चौधरी यांनी १५ जानेवारी २०१५ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे स्वीकारली होती. जवळपास दीड वर्ष त्यांनी जि.प.चा कारभार सांभाळला. आता त्यांना बढती मिळाली असून ते भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी झाले आहेत. ‘क्या खोया, क्या पाया’ या विषयावर त्यांनी सोमवारी दुपारी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. एकीकडे जिल्हाधिकारी झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर लपत नव्हता, तर दुसरीकडे नियोजित उपक्रम राबविण्यापूर्वीच बदली झाल्याचे दु:खही ते लपवू शकले नाहीत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ७२४ जि. प. शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्वत:बरोबरच सर्व अधिकाऱ्यांना त्या दत्तक दिल्या होत्या. याप्रमाणे मोमबत्ता तलावामध्ये ‘बोटिंग’चा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. तलावाच्या ठिकाणी बांधकामास सुरुवात झाली; पण मार्चअखेर बोटी खरेदी करण्यासंबंधीची ई- निविदा निघाली नसल्यामुळे त्याबाबत शासनाची परवानगी घेतली जाणार आहे. पदाधिकारीही कधी विकासकामांच्या आड आले नाहीत. औरंगाबाद जि.प.चा कार्यकाळ मी कधीही विसरू शकणार नाही, असे भावनिक उद्गार डॉ. चौधरी यांनी काढले. सिंचन, समाजकल्याण तसेच शिक्षण विभागाला सक्षम अधिकारी हवेत. अलीकडे शिक्षणाधिकारी मोगल यांनी कामामध्ये गती घेतली आहे. सक्षम अधिकारी मिळत नसल्यामुळे त्या विभागांची नेहमी ओरड होते. दुसरीकडे महिला व बालकल्याण विभाग, बांधकाम, आरोग्य या विभागाची कामगिरी बरी आहे. जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत उभारणीचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्यामुळे आपण त्यासंबंधी काही करू शकलो नाही.मालमता विकसित केल्याशिवाय आर्थिक स्रोत बळकट करणे शक्य नाही. कर्मचाऱ्यांमध्ये एकवाक्यता नसल्यामुळे आपण कर्मचारी कल्याण निधीसंबंधी निर्णय घेऊ शकलो नाही. बदनामीकारक आरोप केले जातात म्हणून अधिकारीही निर्णय घेऊ शकत नाहीत, असे डॉ. चौधरी म्हणाले.