शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
2
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
3
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
4
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
5
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
6
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
7
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
8
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
9
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
10
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
11
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
12
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
13
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
14
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
15
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
16
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
17
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
18
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
19
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
20
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”

जिल्हा परिषदेत पुन्हा काँग्रेस आघाडी यशस्वी

By admin | Updated: September 28, 2014 23:51 IST

नांदेड : जिल्हा परिषदेत अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीने वर्चस्व कायम राखताना विरोधकांना नामोहरम केले़

नांदेड : जिल्हा परिषदेत अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीने वर्चस्व कायम राखताना विरोधकांना नामोहरम केले़ अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मंगला गुंडिले आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिलीप धोंडगे यांनी ४५ विरूद्ध १७ अशा मतफरकाने विजय मिळविला़जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसने अध्यक्षपदासाठी वाजेगाव गटातून निवडून आलेल्या मंगला गुंडिले यांना उमेदवारी दिली़ त्यांच्याविरोधात शिवसेनेच्या देगलूर तालुक्यातील करडखेड गटातील महादेवी वाडेकर यांनी अर्ज भरला होता़ हात उंचावून झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या गुंडिले यांना ४५ मते पडली़ उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप धोंडगे यांनी तर त्यांच्या विरोधात भाजपाचे लक्ष्मण ठक्करवाड यांनी अर्ज भरला होता़ धोंडगे यांना ४५ तर ठक्करवाड यांना १७ मते पडली़ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत जाण्याची भूमिका जाहीर केली होती़ राष्ट्रवादीनेही सहकार्य करण्याची तयारी दर्शविताना कोणतेही आढेवेढे घेतले नाही़ अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे हा फॉर्म्युला ठरविण्यात आला़ काँग्रेसने मंगला गुंंडिले व सिंधुताई कमळेकर यांच्यापैकी गुंडिले यांना संधी दिली़ तर राष्ट्रवादीने दिलीप धोंडगे यांना संधी दिली़ सेना-भाजपाने या निवडणुकीत विरोधी पक्षाची भूमिका बजावताना अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी उमेदवार दिले होते़ शिवसेनेच्या वत्सला पुयड यांनी उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली होती़ मात्र ती अर्ज मागे घेण्याच्या कालावधीत मागे घेतली़ सेनेची ९ व सहयोगी ३ भाजपा ४ व एक सहयोगी अशी १७ मते सेना भाजपा उमेदवारांना मिळाली़ तर काँग्रेस आघाडीला काँग्रेसचे २५ व दोन सहयोगी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची १८ मते मिळाली़ भारिप बहुजन महासंघाचे दशरथ लोहबंदे या निवडणुकीत गैरहजर राहिले़ नूतन अध्यक्षा मंगला गुंडिले यांनी जि़ प़ त काम करताना भेदभाव न करता सर्वांना न्याय देण्याची भूमिका राहणार असल्याचे सांगितले़ त्यात शिक्षण आणि आरोग्य या विषयाला प्राधान्य राहणार आहे़ जि़ प़ त काम करताना दबावाला बळी पडणार नसल्याचे सांगितले़ उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनीही आपल्या निवडीमुळे युवकांमध्ये चैतन्य निर्माण झाल्याचे सांगितले़ जिल्हा परिषदेत प्रलंबित असलेल्या बीओटी प्रकल्पाला गती देवून कंधारसह जिल्ह्यातील अन्य ठिकाणच्या व्यापाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न राहणार आहे़ यातून जिल्हा परिषदेचे उत्पन्नही वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे धोंडगे यांनी सांगितले़(प्रतिनिधी)