शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेची इंग्रजी शाळांना नोटीस

By admin | Updated: June 24, 2014 00:39 IST

नांदेड : बालकांचा शिक्षणाचा मोफत हक्क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकातील मुलांना २५ टक्के प्रवेश देण्यासंदर्भात जिल्हा परिषदेने बोलावलेल्या कार्यशाळेस गैरहजर राहणाऱ्या

नांदेड : बालकांचा शिक्षणाचा मोफत हक्क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकातील मुलांना २५ टक्के प्रवेश देण्यासंदर्भात जिल्हा परिषदेने बोलावलेल्या कार्यशाळेस गैरहजर राहणाऱ्या जिल्ह्यातील १७ शाळांच्या मुख्याध्यापकांना जिल्हा परिषदेने नोटीस बजावली आहे़शनिवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश नियमाच्या अंमलबजावणीसंदर्भात कार्यशाळा घेण्यात आली़ या कार्यशाळेत शहर व परिसरातील सर्व इंग्रजी शाळा तसेच गर्दीच्या शाळांच्या मुख्याध्यापक, संस्थाचालकांना बोलावण्यात आले होते़ मात्र जिल्हा परिषदेने बोलावलेल्या या कार्यशाळेकडे १७ शाळांच्या मुख्याध्यापकांनी पाठ फिरवत प्रतिनिधींनी पाठवले़ हे प्रतिनिधीही शाळेच्या कारभाराबाबत अनभिज्ञच होते़ जि़ प़ च्या पदाधिकारी व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी विचारलेली माहिती सांगण्यास ते असमर्थ ठरले़ परिणामी अनुपस्थित मुख्याध्यापकांना नोटीस बजावण्यात आली़ त्यामध्ये केंब्रिज इंग्रजी स्कूल बारड, सनराईज इंग्रजी स्कूल नरसी, न्यू प्रायमरी इंग्रजी स्कूल नायगाव, ईगल इंग्रजी स्कूल रातोळी, आॅक्सफर्ड इंग्रजी स्कूल नवामोंढा, विद्याविकास स्कूल, व्ही़ पी़ इंग्लीश स्कूल पूर्णा रोड, ग्यानमाता हायस्कूल, ब्ल्यू बेल्स नायगाव, मॉडर्न इंग्लीश स्कूल माहूर, शांतीनिकेतन इंग्लीश स्कूल नांदेड, राजर्षी शाहू हायस्कूल वसंतनगर, एमपीएस इंग्लीश स्कूल आणि लिटल फ्लॉवर इंग्लीश स्कूल बिलोली या शाळांचा समावेश असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली़ दरम्यान, शिक्षण विभागाने दुर्बल व वंचित घटकातील मुलांना २५ टक्के मोफत प्रवेश देण्यासंदर्भात घेतलेल्या कार्यशाळेमुळे चांगली जनजागृती झाल्याचे पालकांनी सांगितले़ (प्रतिनिधी)