शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी सभापतीची लागणार कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:05 IST

रऊफ शेख फुलंब्री : मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत तालुक्यातून दोन सभापती मिळाल्याने राजकीय पटलावर तालुक्याचे वजन आहे. मात्र, ...

रऊफ शेख

फुलंब्री : मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत तालुक्यातून दोन सभापती मिळाल्याने राजकीय पटलावर तालुक्याचे वजन आहे. मात्र, या सभापतींना आगामी ग्रामपंचायतीच्या आखाड्यात आपल्या गटातील निवडणुका जिंकण्यासाठी कस लागणार आहे. फुलंब्री तालुक्यात १५ जानेवारीला ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान होणार असून निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.

ग्रामपंचायतीच्या या रणसंग्रामात सध्या प्रत्येक गावात निवडणुकीचे वातावरण तापले असून पॅनल तयार करण्यासाठी गावातील पुढारी, कार्यकर्ते व्यस्त असल्याचे चित्र आहे. आपल्या गटातील ग्रामपंचायती कशा प्रकारे आपल्याच ताब्यात येतील, याकडे जिल्हा परिषद सदस्य तथा सभापती जोमाने कामाला लागलेले आहेत. या सभापतीचे येणाऱ्या काळातील भवितव्य या निवडणुकीवर अवलंबून असल्याने संबंधितांनी आपला मोर्चा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे वळवला आहे.

---------------

बांधकाम सभापती किशोर बलांडे हे वडोद बाजार गटाचे सदस्य असून २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत अवघ्या २९९ मतांनी निवडून आले होते. जिल्हा परिषदेत ते बांधकाम सभापती म्हणून कार्यरत आहेत. त्याच्या गटातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका असून बोरगाव अर्ज, वडोद बाजार, जळगाव मेटे, महालकिन्होला या महत्त्वाच्या ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी त्यांची कसोटी लागणार आहे.

--------------

महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण या गणोरी गटाचे प्रतिनिधित्व करतात. गेल्या निवडणुकीत त्या विक्रमी ५१८६ मतांनी निवडून आल्या होत्या. त्या सध्या जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण सभापती असून त्यांच्या गटात १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. यात गणोरी, किनगाव, वारेगाव, वाणेगाव, पिंपळगाव वळण, शिरोडी या

प्रमुख ग्रामपंचायतींसाठी चुरस असेल.

-------------

फुलंब्री तालुक्यातील दोन जिल्हा परिषद सभापती यांच्या गटातील दहा ग्रामपंचायती महत्त्वाच्या असून संबंधित निवडणुका अंत्यत अटीतटीच्या होणार असल्याचे चित्र आहे. आपल्या पॅनलमधील उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सभापती याची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. कारण ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले सदस्य, सरपंच हे जिल्हा परिषद निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने आगामी निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत.

-------------

गटातील सर्वच १३ ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया सुरू असून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी पॅनलमध्ये सक्षम उमेदवारास प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे गटातील सर्वच ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण यांनी स्पष्ट केले.