शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

युवराजला केले नातेवाईकांच्या स्वाधिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:54 IST

कळमनुरी तालुक्यातील नांदापूर रेल्वेस्थानकावर विसरुन राहिलेला तिन वर्षिय बालक रेल्वे पोलीस व अधिकाºयाच्या सतर्कतेमुळे नातेवाईकाच्या स्वाधिन करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील नांदापूर रेल्वेस्थानकावर विसरुन राहिलेला तिन वर्षिय बालक रेल्वे पोलीस व अधिकाºयाच्या सतर्कतेमुळे नातेवाईकाच्या स्वाधिन करण्यात आला.पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील करवाडी येथील कांबळे कुटूंब १० सप्टेंबर रोजी रेल्वेने जाण्यासाठी नांदापूर रेल्वेस्टेशनवर सकाळी ९ च्या सुमारास आले होते. स्थानकावर रेल्वे आल्यानंतर कांबळे कुटुंबातील सदस्य रेल्वेत जागा पकडण्यासाठी धावून गेले. त्यांनी जागाही पकडली. रेल्वे सुरु झाल्यानंतर त्यांच्या सोबत असलेल्या तीन वर्षीय युवराज रेल्वेमध्ये नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे सर्वच नातेवाईक घाबरले होते. रेल्वेतील काही प्रवासी कांबळे कुटूंबियांच्या सदस्यांना साकळी ओढण्याचा सल्ला देत होते. दरम्यान, त्याच डब्यात प्रवास करीत असलेले रेल्वे सुरक्षाबलातील एएसआय तात्याराव पिवळ यांनी कांबळे परिवातील सदस्यांना विचारणा करुन त्यांना धिर दिला. व लागलीच नांदापूर रेल्वेस्थानकावरील स्टेशन मास्तर अनिल डोंगरे यांच्यासोबत फोनद्वारे संपर्क साधला. विसरुन राहिलेल्या बालकाची माहिती दिली. तर त्यांनी काही क्षणातच बालक असल्याची माहिती पिवळ यांना दिली. नंतर पिवळ यांनी नातेवाईकांना बालक सुखरुप असल्याचे सांगितले. तर कांबळे कुटुंबियांनी आपल्या नातेवाईक गंगाधर कºहाळे यांना नांदापूर रेल्वेस्थानकावर पाठविले. नंतर स्टेशन मास्तर डोंगरे यांनी कºहाळे यांचा ओळख पुराव्याची खात्री करुन युवराजला त्यांच्या स्वाधिन केले. एका रेल्वे पोलीस अधिकाºयाच्या सतकर्तेने बालक सुखरुप सापडल्याने नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे यापूर्वीही हिंगोली रेल्वेस्थानकावर २० जुलै रोजी असाच एक हरवलेला बालक पिवळ यांनी त्याच्या नातेवाईकाच्या स्वाधिन केला होता.