शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

युवकास डेंग्यूची लागण

By admin | Updated: October 29, 2015 00:19 IST

तुळजापूर : शहरातील लोहिया मंगल कार्यालय परिसरात राहणाऱ्या एका २१ वर्षीय युवकास डेंग्यू आजाराची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून पुढे आले आहे.

तुळजापूर : शहरातील लोहिया मंगल कार्यालय परिसरात राहणाऱ्या एका २१ वर्षीय युवकास डेंग्यू आजाराची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून पुढे आले आहे. यापूर्वीही नवरात्रोत्सव कालावधीत बंदोबस्तासाठी आलेल्या दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना या आजाराची लागण झाली होती. त्यामुळे पालिकने शहरात तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. याबाबत माहिती अशी की, शहरात लोहिया मंगल कार्यालयानजीक राहणारे सागर सुधाकर मुळे (वय २१) हे तापिने त्रस्त असल्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांच्या रक्तातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण कमी झाल्यामुळे रक्त नमुन्यांची तपासणी केली असता त्यांना डेंग्यू आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. यापूर्वीही शारदीय नवरात्रोत्सव कालावधीत येथे बंदोबस्तासाठी आलेल्या दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना डेंग्यू आजाराची लागण झाली होती. त्यांच्यावरही उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. श्री तुळजाभवानी मातेच्या नवरात्रोत्सवानिमित्त विविध ठिकाणाहून लाखोंच्या संख्येने भाविक तुळजापुरात दाखल झाले होते. त्यामुळे जागोजागी कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच डेंग्यू आजाराचे रुग्ण आढळून आल्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नगर परिषदेने शहरात तातडीने शहरात स्वच्छता मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. (वार्ताहर)