शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शहर सुशोभीकरणाचा तरुणाईने घेतला वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:53 IST

शहर सुशोभीकरणाचा उपक्रम जेएनईसीच्या आर्किटेक्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरामध्ये सध्या काही मुले-मुली उड्डाणपूल आणि मोकळ्या जागी रंगरंगोटी, स्वच्छता आणि बाके, खुर्च्या, खेळण्या ठेवून ती जागा सजवताना दिसतात. ते पाहून आपसुकच कुतूहल जागृत होते. औत्सुक्याचा विषय बनलेला हा शहर सुशोभीकरणाचा उपक्रम जेएनईसीच्या आर्किटेक्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतला आहे.काही दिवसांपूर्वी सलीम अली सरोवरापाशी पडीक असलेला जॉगिंग ट्रॅक विकसित केल्यानंतर या विद्यार्थ्यांनी अत्यंत कल्पकतेने संग्रामनगर उड्डाणपुलाखाली व कॅनॉट प्लेस येथील एका मोकळ्या कोपºयाचे सुशोभीकरण केले. शहरातील उड्डाणपुलांखाली असणाºया जागेचा होणारा दुरुपयोग नेहमीच चिंतेचा विषय झाला आहे. लघुशंका करण्यापासून ते जुगार खेळण्यापर्यंतचे गैरप्रकार तेथे घडतात.हेच हेरून वास्तुकलेच्या विद्यार्थ्यांनी नगरसेविका शोभा बुरांडे यांच्या सहकार्याने आसपासच्या शाळांतील विद्यार्थी व पालकांना वाट पाहण्यासाठी जागा म्हणून संग्रामनगर उड्डाणपुलाखालील जागेचे सुशोभीकरण केले. शाळा सुटल्यावर पालकांची वाट पाहणाºया विद्यार्थ्यांसाठी येथे झोका, पेंटिंग, विविध प्रकारचे लाइटस् अशा विविध वस्तू लावण्यात आल्या आहेत. सकाळी व सायंकाळी फिरायला येणाºया वृद्धांना, नागरिकांना बसण्यासाठी विविध बेंचेस, स्टुल इतर वस्तूदेखील येथे ठेवण्यात आल्या आहेत. पुलाच्या भिंती व खांबांवर आकर्षक चित्रे रंगवली आहेत.कॅनॉट कट्टाशहरात अनेक ठिकाणी मोकळ्या जागा असून, त्या कचराकुंड्या बनल्या आहेत. कॅनॉट प्लेस येथील असाच एक मोकळा कोपरा जेएनईसीच्या या विद्यार्थ्यांनी देखणा केला आहे. कचरा साफ करून तेथे जुन्या सायकल्स, स्कूटर, हातगाडी यांना रंगरंगोटी व दुरुस्त करून बसण्यासाठी बाके म्हणून कल्पक मांडणी केली आहे. तसेच माणुसकीची भिंत व पक्ष्यांसाठी झाडांना पिंजरेदेखील बांधले.लोकांना बसण्यासाठी, मित्रांना गप्पा मारण्यासाठी एक प्रसन्न कट्टा यानिमित्ताने तयार झाला आहे. त्यासाठी एमजीएम ट्रस्टने आर्थिक मदत केली.सदरील उपक्रमात साया कपूर, सौमित्र जाधव, वीरेन तावडे, स्फूर्ती रामेकर, अमृता बेदमुथा, कल्याणी सेठी, नम्रता बोरा, इशा महाजन, अंकिता हांगे, नेहा तांगडे, रोमा रोचावाणी, निधी साहुजी, शिवानी श्रीवास्तव, ऋतंभरा केवलराम, मयूर वाघुले, ऋषिकेश वाघ, शेख मुजाहिद आदी विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.