शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी तंत्रज्ञानाचा विधायक वापर करावा

By admin | Updated: July 25, 2016 00:39 IST

लातूर : तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटमुळे मोठी क्रांती झाली. मात्र, इंटरनेटचे जेवढे फायदे आहेत, त्याहीपेक्षा अधिक दुष्परिणाम असल्याचे अलिकडील काळात पुढे आले आहे.

लातूर : तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटमुळे मोठी क्रांती झाली. मात्र, इंटरनेटचे जेवढे फायदे आहेत, त्याहीपेक्षा अधिक दुष्परिणाम असल्याचे अलिकडील काळात पुढे आले आहे. युवकांनी प्रवाहाबरोबर वाहत न जाता प्रत्येक बाबींची शहानिशा करुनच तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीने विधायक कामासाठी करावा, असा सल्ला राज्याचे दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी लातुरात रविवारी युवकांना दिला. येथील दयानंद सभागृहात आयोजित रोटरी क्लब लातूर सेंट्रल पदग्रहण समारंभात त्यांनी ‘दहशतवाद व युवकांची जबाबदारी’ या विषयावर संवाद साधला. मंचावर पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड, रवींद्र साळुंके, बसवराज उटगे, विनय जाजू, सुखानंद शेटकार, श्रीरंग महाराज औसेकर, मेघराज बरबडे, पुरुषोत्तम सोनी, संजय सोनी यांची उपस्थिती होती. ‘दहशतवाद आणि युवकांची जबाबदारी’ या विषयावर युवकांशी संवाद साधताना कुलकर्णी म्हणाले, आजचा युवक हा ज्ञानाने, माहितीने प्रगल्भ आहे. संगणक, मोबाईल स्क्रिनवर टच केल्यानंतर माहितीची अनेक दालने उघडली जातात. एवढे सर्व काही असले तरी आजच्या युवकांमध्ये ध्येयवादाचा अभाव आहे. सध्याच्या पिढीसमोर चांगले आदर्श निर्माण करता आले नाही, यासाठी मागच्या पिढीला जबाबदार धरावे लागेल. आपले संपूर्ण जीवनच इथल्या राजकारणाने व्यापले आहे. आपण त्यांच्यातच आपला आदर्श शोधायला लागलो आहोत, म्हणून ध्येय ठरवताना युवकांची गफलत होत आहे. प्रास्ताविक मेघराज बरबडे यांनी केले. सूत्रसंचालन लक्ष्मीकांत सोनी यांनी तर आभार संजय बोरा यांनी मानले. (प्रतिनिधी)