शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात भरणार कलाविष्कारांचा मेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:31 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाला रविवारपासून सृजनरंग रंगमंचावर सुरुवात होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाला रविवारपासून सृजनरंग रंगमंचावर सुरुवात होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांच्या हस्ते होईल. शनिवारपासून ते बुधवारपर्यंत महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा कलाविष्कार पाहायला मिळणार आहे.विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव प्रत्येक वर्षी घेण्यात येतो. मागील वर्षी हा युवक महोत्सव तुळजापूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात झाला होता. यावर्षी विद्यापीठ परिसरातच होतआहे.हा महोत्सव ऐन दिवाळीच्या सुट्यांमध्येच आयोजित केल्यामुळे पुरेशी वातावरणनिर्मिती झालेली नाही. अनेक विद्यार्थी अद्यापही गावाहून परतलेले नाहीत. यामुळे महोत्सवाला एक दिवस उरला असतानाच केवळ विद्यार्थी कल्याण संचालक विभागातच तयारीची धामधूम सुरू होती. या महोत्सवात विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचा-यांनी यावेळी अलिप्त राहणेच पसंत केले आहे. केवळ विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. मुस्तजिब खान यांची मित्रमंडळी महोत्सवाच्या यशस्वी नियोजनासाठी प्रयत्न करीतआहे.महोत्सवात सहभागी होण्यासाठी दोनशेपेक्षा अधिक महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी किती संघ प्रत्यक्ष सहभागी होतात. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.जेवण कंत्राटाचा शेवटपर्यंत गोंधळविद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातून येणाºया २ हजार कलाकारांच्या राहण्याची व्यवस्था विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या वसतिगृहात करण्यात आली आहे; मात्र या सर्वांना नाश्ता, चहासह दुपार आणि संध्याकाळच्या जेवणासाठी निविदा मागविल्या होत्या; मात्र केवळ दोनच निविदा आल्या.या दोन्ही निविदा एकाच व्यक्तीने टाकल्याचे स्पष्ट झाले. यामुळे कुलगुरूंनी विश्रामगृहातील खानावळ चालकाला कलाकारांचे जेवण बनविण्याचे आदेश दिले; मात्र काही विद्यार्थी संघटनांच्या नेत्यांनी हस्तक्षेप करीत त्याच निविदाधारकांना कंत्राट देण्यास भाग पाडल्याचेसमजते.