शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

ठसकेबाज लावण्यांनी केले घायाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:57 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवातील सृजन रंग रंगमंचावर दुपारी दोन वाजेपासून प्रसिद्ध लावणी स्पर्धेला सुुरुवात झाली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : रंगमंचावर रूपवान लावण्यवती... त्याच्या जोडीला ठसकेबाज लावण्या गाणारा गायक, ढोलकीवादक अन् समोर सळसळत्या उत्साहाची तरुणाई...असाच माहोल दुपारच्या दोन वाजेपासून ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत कायम होता. निमित्त होत सृजन रंग रंगमंचावरील लावणी स्पर्धेचे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवातील सृजन रंग रंगमंचावर दुपारी दोन वाजेपासून प्रसिद्ध लावणी स्पर्धेला सुुरुवात झाली. लावण्या पाहण्यासाठी सकाळी ११ वाजेपासूनच तरुणाईने सभागृह फुलून गेले होते. शहारासह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक अन् विद्यार्थी लावण्या सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत होते; मात्र इतर ठिकाणी स्पर्धा सुरू असल्यामुळे लावणीतील स्पर्धकांना रंगमंचावर येण्यास उशीर झाला. यातच दुपार झाली असल्यामुळे अनेकांनी जेवण करूनच सादरीकरण करण्यास प्राधान्य दिले. यात उशीर होत असल्यामुळे संयोजकांनी सैराट चित्रपटातील ‘झिंग झिंग झिंगाट...’ गाणे लावले. यावर तरुण-तरुणींनी चांगलाच ठेका धरला होता. ग्रुपने सर्वजण बेधुंद होऊन नाचत होते. यातच संयोजक लावण्यांचे सादरीकरण करण्यासाठी संघांना बोलावणे धाडत होते. उशीर होत असतानाही रसिकांनी सभागृहातून काढता पाय घेतला नाही. यातच एका कलाकाराने ‘घ्यावा माझा सलामीचा मुजरा... महाराष्ट्राच्या मातीत रुजल कला गुणांचं लेणं... मराठमोळं गाणं...’ ही लावणी सादर केली अन् एकच जल्लोष झाला. रंगमंचासमोरील प्रत्येक जण ठेका धरत होता. यातच पुढील काही वेळ कोणताही संघ सादरीकरणासाठी आला नाही. त्यामुळे लावण्या सादर करण्यात खंड पडला.यानंतर देवगिरी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने ‘राया वाटलं होत तुम्ही याल...’ ही लावणी सादर करीत सर्वांनाच घायाळ करून टाकले. घोषणा, जल्लोष, शिट्यांचा खणखणाट सुरूच होता. यानंतर ‘नार देखणी, केस सोडून....राखली की मर्जी तुमची’, ‘मला जाऊ द्या ना घरी.. आता वाजले की बारा...’, ‘अप्सरा आली...चांदणी रंग महाल...’ या लावणीने तर जल्लोषाचा कळसच गाठला. ‘भिर भिर भिरती पाखरावानी..कुठच दाणा मिळेना... काखेत कळसा गावाला वळसा कशाला...’ अशा दिलखेचक अदाकारीच्या लावण्यांनी रंगत आणली होती.