हिंगोली : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात केंद्र सरकारने चालविलेल्या हस्तक्षेपाच्या निषेधार्थ काँग्रेस रस्त्यावर उतरली असून, आज येथील गांधी चौकात युवक काँग्रेस व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करत आपला संताप व्यक्त केला. आंदोलनात युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ हत्तिअंबिरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, तालुकाध्यक्ष प्रकाश थोरात, जि.प.सदस्य बाबा नाईक, विनायकराव देशमुख, माजी नगराध्यक्ष अब्दुल हफीज, काँग्रेस नेते जकी कुरेशी, भागोराव राठोड, बापूराव बांगर, विश्वास बांगर, उपसभापती संतोष जगताप, विलास गोरे, पं.स.सदस्य धनंजय पाटील, दुलेखाँ पठाण, बाबाराव शिंदे, दत्तराव कदम, असद कादरी, युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष शेख कलीम, उपाध्यक्ष राजाराम खराटे, नगरसेवक नंदकिशोर तोष्णीवाल, हाफीज फारूखी, मिलिंद उबाळे, शेख मोईन, फारूख बागवान, नंदू पाटील, दिलीप होडबे, डॉ. भानुदास वामन, नजीर पठाण, मुजीब पठाण, मेहसन चाऊस, शेख अलिमोद्दीन, मयूर राठोड, स्वप्निल इंगळे, संजय भोसले, दत्ता बोंढारे, अशोक पोले, राजू उपाध्याय, चंद्रकांत घोंगडे, विश्वनाथ मांडगे, राजन गर्गे, बंटी राठोड उपस्थित होते. संजय बोंढारे यांनी सांगितले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना राजकीय सुडापोटी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात गोवले जात आहे, असा आरोप करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. तर भाजप सरकार काँग्रेस नेत्यांविरोधात सूडबुद्धीने कारवाई करत आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारला अशा कारवायांसाठी वेळ आहे. मात्र जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी वेळ नाही, असा घणाघात युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ हत्तिअंबिरे यांनी केला. या आंदोलनात युवक काँग्रेसचे गजानन पाटील, अशोक सवंडकर, पुष्पक देशमुख, अभिजित पवार, विजय सातव, सय्यद वाजीद, नीलेश पाटील, अविनाश चव्हाण यांच्यासह युवक काँग्रेस व काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. तसेच काहींनी फलक व कॉंग्रेसचे झेंडेही आणल्याचे पहायला मिळाले. (जिल्हा प्रतिनिधी)
युवक काँग्रेसची हिंगोलीत निदर्शने
By admin | Updated: December 20, 2015 00:06 IST