शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेसची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:56 IST

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने जनजागृती मोहीम हाती घेतली असून, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पेट्रोलपंपांवर व कॉलेज टू कॉलेज जाऊन पत्रके वाटणार आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने जनजागृती मोहीम हाती घेतली असून, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पेट्रोलपंपांवर व कॉलेज टू कॉलेज जाऊन पत्रके वाटणार आहेत. ही मोहीम आजपासून औरंगाबादेत व हळूहळू महाराष्टÑभर राबविण्यात येणार असल्याची माहिती आज येथे एका पत्रपरिषदेत प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली.त्यांनी सांगितले की, इंधन दरवाढीमुळे जनतेत प्रचंड असंतोष खदखदतोय. यासाठी आता युवक काँग्रेस आक्रमक कार्यक्रम हाती घेणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुमारे ५० हजार पत्रके एकट्या औरंगाबादेत वाटून मोठी जनजागृती करणार आहे.२०१०-१३ या कालावधीत आंतरराष्टÑीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती १२० ते १५० डॉलर प्रतिबॅरलपर्यंत पोहोचल्या होत्या. तत्कालीन काँग्रेस सरकारने जनतेच्या भल्याचा विचार करून पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणात ठेवले होते. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घट होऊन ते दर ५५ डॉलर प्रतिबॅरलपर्यंत खाली आले आहेत. असे असतानाही ८० रु. लिटर पेट्रोलचा दर आकारून सरकारने जनतेची लूट चालविली आहे. गेल्या दोन वर्षांत कच्च्या तेलाच्या दरात आंतरराष्टÑीय बाजारपेठेत फारसा फरक पडलेला नाही. तरीही पेट्रोलचा दर तब्बल २० रुपयांहून अधिक वाढला. विकासाच्या नावाखाली सुरू असलेली ही लूट आणखी किती काळ सहन करायची? असा सवाल तांबे यांनी उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, सरकारने आंतरराष्टÑीय दराप्रमाणे दररोज इंधन दर बदलत राहणार, अशी पद्धती स्वीकारली आणि त्याच्या नावाखाली अवघ्या ७२ दिवसांत पेट्रोलचे दर १६ रुपयांनी वाढवून टाकले. १ जुलै २०१७ रोजी ६३ रु. प्रतिलिटर असणारे पेट्रोल आज ८०-८१ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले. डिझेलच्या बाबतीत असेच झाले आहे. नोटाबंदी व जीएसटीमध्ये आलेले अपयश लपविण्यासाठी आणि अर्थव्यवस्था सुधारत नाही म्हणून सरकार जनतेकडून कराची तुघलकी वसुली करीत आहे.आता दारूची दुकाने चालू झाली आहेत. त्यामुळे महाराष्टÑ सरकारने लावलेले उपकर तात्काळ मागे घेतले पाहिजे व पेट्रोलवर जीएसटी लावून दर तात्काळ कमी करण्यात आले पाहिजे, अशी आग्रही मागणी यावेळी तांबे यांनी केली.पत्रपरिषदेस प्रदेश प्रतिनिधी जितेंद्र देहाडे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर मुठ्ठे पाटील, अकिल पटेल, मोईन इनामदार, खालेद पठाण, सलमान पटेल, आमेर अब्दुल सलीम, कमलेश कामिटे, सोनू पाईकडे, इम्रान पटेल, इद्रीस नवाज खान आदींची उपस्थिती होती.