शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उच्च शिक्षणासाठी पैसे नसल्याने युवकाने केली आत्महत्या

By admin | Updated: May 7, 2017 00:13 IST

लोहारा : आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याने नैराश्य आलेल्या एका २२ वर्षीय तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली़

लोकमत न्यूज नेटवर्कलोहारा : आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याने नैराश्य आलेल्या एका २२ वर्षीय तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही घटना लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे शनिवारी सकाळी घडली.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील मनिष नवनाथ कांबळे (वय २२- वर्ष) हा युवक तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बी. एस्सी. च्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याला एमबीए करायची इच्छा होती. यासाठी त्याने दोन महिन्यांपूर्वी बंगळूर येथील महाविद्यालयात अर्ज केला होता़ मात्र, टक्केवारी कमी असल्याने एमबीएला प्रवेश घेण्यासाठी तीन ते चार लाख रुपये लागणार होते. एवढे पैसे आणायचे कुठून हा प्रश्न त्याच्या व कुटुंबाच्या समोर होता. घरची तीन एकर शेती असून, या शेतीवर कर्ज काढून आपण पैसे भरु शकतो, अशी आशा असल्याने त्याने तुळजापूर येथील एका बँकेकडे शेतीसाठी कर्जाची मागणी केली होती़ मात्र, बँकेनेही कर्ज देण्यास टाळटाळ केली. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असून, आई-वडील, मोठा भाऊ मोलमजुरी करून मनिषच्या शिक्षणासाठी खर्च करीत होते. पुढील उच्च शिक्षणाचा आर्थिक खर्च आई-वडिलांना झेपणार नाही. त्यामुळे आपले शैक्षणिक स्वप्न पूर्ण होणार नसल्याच्या चिंतेने नैराश्य आलेल्या मनिष याने शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातील पत्र्याच्या आडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेबाबत लोहारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ पुढील तपास पोलीस हवालदार अशोक सांगवे करीत आहेत. मयत मनिष याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ व दोन विवाहित बहिणी असा परीवार आहे. उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागत असल्याने मनिषने केलेल्या आत्महत्येने हिप्परगा (रवा) गावावर शोककळा पसरली आहे़ दरम्यान, मनिष याच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते.