शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘तू गावात दादागिरी करतोस काय’ असे म्हणत तीन जणांनी केला युवकावर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:04 IST

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा काळे हा रात्री साडेआठ नऊ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून शिवना गावाकडे जात होता. तेव्हा पांढऱ्या रंगाची ...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा काळे हा रात्री साडेआठ नऊ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून शिवना गावाकडे जात होता. तेव्हा पांढऱ्या रंगाची कार समोरून आली. आम्हाला भोकरदनकडे जायचे आहे. भोकरदन रस्ता कुठे आहे आणि कसा आहे, अशी विचारणा त्यांनी कृष्णाला केली. तेव्हा कृष्णा याने पुढाकार घेत त्यांना भोकरदन रस्ता दाखविला. त्यांना रस्त्याबद्दल माहिती देऊन तो शिवनाकडे निघाला. तेव्हा अचानक कारमधील तिघेजण खाली उतरून त्याच्याकडे आले. त्यांनी धारदार शस्त्राने वार करण्यास सुरूवात केली. तू गावात दादागिरी करतोस काय, थांब तुझा काटाच काढतो, अशी धमकी देत व शिवीगाळ करून त्या अज्ञात हल्लेखोरांनी कृष्णाला जखमी केले. काही क्षणातच त्यांनी कारमध्ये बसून घटनास्थळावरून प‌ळ काढला. ही घटना शिवना गावापासून काही अंतरावर झाल्याने आजूबाजूला असलेल्या काही नागरिकांना ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कृष्णा काळ‌े याला उपचारासाठी अंजिठा रुग्णालयात नेण्यात आले. अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीधर ठाकूर यांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरूद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास बीट जमादार नीलेश सिरस्कर, कौतीक चव्हाण हे करीत आहेत.

---

आरडाओरड झाल्याने वाचला जीव

कृष्णा का‌ळ‌े याच्यावर अचानक धारदार शस्त्राने हल्ला सुरू झाला. काही क‌ळण्याच्या आत धमकी व शिवीगा‌ळ‌ केली जाऊ लागली. तेव्हा कृष्णावर वार होताच त्याने आरडाओरड सुरू केली. शिवना गावापासून काही अंतरावरच ही घटना घडत होती. रात्री नऊ वाजण्याची वे‌ळ असल्याने गावालगत फिरण्यास गेलेल्या नागरिकांनी हा ओरडण्याचा आवाज ऐकला. त्यांनी धावाधाव सुरू केल्याने कृष्णाचा जीव वाचला. गावात दादागिरी करतो, अशी धमकी देत मारहाण झाल्याने मारहाणीत गावातील कोणाचा तरी हात असू शकतो, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

फोटो :

020621\img-20210602-wa0144_1.jpg

चाकूने झाला हल्ला