शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

युवा सचिन लव्हेराच्या खेळीने महावितरणची मुंबईच्या संघावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:11 IST

एमजीएम ट्वेंटी २0 क्रिकेट स्पर्धेत यंग इलेव्हन अ, महावितरण आणि कन्नड सुपर किंग संघाने उपांत्य फेरीत धडक मारली. आज झालेल्या सामन्यात युवा फलंदाज सचिन लव्हेरा याची झुंजार खेळी वैशिष्ट्य ठरले.

ठळक मुद्देएमजीएम टी २0 क्रिकेट स्पर्धा : निरज शिमरे सामनावीर

औरंगाबाद : एमजीएम ट्वेंटी २0 क्रिकेट स्पर्धेत यंग इलेव्हन अ, महावितरण आणि कन्नड सुपर किंग संघाने उपांत्य फेरीत धडक मारली. आज झालेल्या सामन्यात युवा फलंदाज सचिन लव्हेरा याची झुंजार खेळी वैशिष्ट्य ठरले.सकाळच्या सत्रात झालेल्या लढतीत एमजीएम संघाविरुद्ध यंग इलेव्हन अ संघाने २0 षटकांत ४ बाद १४४ धावा केल्या. त्यांच्याकडून निरज शिमरेने ३0 चेंडूंत ४४ धावा केल्या. राहुल शर्माने ४२ व अजय काळे याने २९ धावा केल्या. एमजीएमकडून रहीम खानने २, तर अनंत बकाल व प्रसाद यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात एमजीएम संघ २0 षटकांत ६ बाद १२८ पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून अंकित चोनकर याने २ षटकार व ४ चौकारांसह ३८ चेंडूंत ५३ धावा केल्या. दुपारच्या सत्रात महावितरण संघाने ईएससीए मुंबई संघावर ५ गडी राखून मात केली. युवा फलंदाज सचिन लव्हेरा याच्या ८ चौकारांसह नाबाद ५१ धावांच्या बळावर महावितरण संघाने ११९ धावांचे लक्ष्य ५ गडी गमावून गाठले. पवन सूर्यवंशी व सतीश भुजंगे यांनी प्रत्येकी १४ धावा केल्या. त्याआधी मुंबईने २0 षटकांत ८ बाद ११८ धावा केल्या. त्यांच्याकडून दीपक नेरवालने ३५ व वैभव कळमकरने २५ धावा केल्या. महावितरण संघाकडून शाहीद सिद्दीकी व भास्कर जिवरग यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.