शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वादातून तरुणाचा चाकूने भोसकून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:05 IST

औरंगाबाद : किरकोळ कारणावरून मित्रासोबत झालेल्या वादातून एका २१ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना एसबीओए शाळेसमोर ...

औरंगाबाद : किरकोळ कारणावरून मित्रासोबत झालेल्या वादातून एका २१ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना एसबीओए शाळेसमोर मयूर पार्क येथील तुळजाभवानी चौकात शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे सूत्राने सांगितले. यश जयंत महेंद्रकर (रा. नवजीवन कॉलनी, एन-१२, हडको), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, यश महेंद्रकर याचा एका तरुणासोबत जुना वाद होता. यशने शनिवारी रात्री मयूर पार्क येथील तुळजाभवानी चौकात राज नावाच्या तरुणाला तडजोड करण्यासाठी बोलावले होते. यावेळी त्यांच्यात वादावादी सुरू झाली. तेव्हा राजने अचानक यशला चाकूने भोसकले. या घटनेत यश खाली कोसळताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. यानंतर यशला त्याच्या मित्रांनी गंभीर जखमी अवस्थेत मित्रांनी घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला संशयावरून ताब्यात घेतले.

चौकट...

मयूर पार्क परिसरात खळबळ

या घटनेमुळे मयूर पार्क परिसरात खळबळ उडाली असून, रात्री उशिरापर्यंत घटनास्थळावर फॉरेन्सिक पथक नमुने गोळा करीत होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन इंगोले आणि अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी आणि घाटी रुग्णालयात धाव घेतली. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यशच्या खुनाचे अन्य काही कारण आहे का, यात किती आरोपी आहेत, याचा तपास पोलिसांनी सुरू केला.