शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मुलीचे नाव घेत तरुणाने पेटवून घेत केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:05 IST

औरंगाबाद : संपूर्ण जग व्हॅलेंटाईन डे साजरा करीत असताना रविवारी (दि.१४) मध्यरात्री २० ते २५ वर्षांच्या अनोळखी तरुणाने ...

औरंगाबाद : संपूर्ण जग व्हॅलेंटाईन डे साजरा करीत असताना रविवारी (दि.१४) मध्यरात्री २० ते २५ वर्षांच्या अनोळखी तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शिवशंकर कॉलनीत घडली. या घटनेत १०० टक्के जळाल्याने तो घटनास्थळीच मरण पावला. यावेळी तो एका तरुणीच्या नावाने ओरडत होता, प्रेमभंग झाल्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली.

शिवशंकर कॉलनीतील शिव हनुमान मंदिरामागील गल्लीत एका अनोळखी तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतले. पेटलेल्या अवस्थेत तो एका तरुणीच्या नावाने ओरडत ओरडत शांत होऊन कोसळला. ही माहिती मिळताच, जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत उशीर झाला होता. पोलिसांनी मृतदेह घाटी रुग्णालयात हलविला. पोलिसांनी सांगितले की, घटनेपासून सोमवारी रात्री उशिरापर्यंत मृताची ओळख पटलेली नाही. तरुणाचे वय अंदाजे २० ते २५ वर्षे असावे. त्याच्या अंगावर मरून रंगाचा टी शर्ट आणि काळी जिन्स आहे. डाव्या हातावर इंग्रजीत आकाश अक्षर आहे, तर उजव्या हातावर अश्विनी नावाचा टॅटू काढलेला. उजव्या हातातील एका बोटात खड्याची अंगठी आहे. त्याचा मोबाइलचाही या घटनेत जळाला. यामुळे त्याची ओळख पटलेली नाही. या वर्णनाच्या तरुणाला कोणी ओळखत असेल, तर तातडीने जवाहरनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी केले. याविषयी जवाहरनगर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शशिकांत तायडे तपास करीत आहेत.

=====

प्रेमभंगातून आत्महत्या केल्याचा कयास

व्हॅलेंटाईन डेला तरुणाने आत्महत्या केल्यामुळे त्याचा प्रेमभंग झाला असावा, या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे फौजदार तायडे यांनी सांगितले. त्याने जाळून घेतले, तेव्हा तो मुलीचे नाव घेऊन ओरडत होता, यावरून या घटनेला प्रेम प्रकरणाची किनार असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे ते म्हणाले. हा तरुण कोण होता, याविषयी घटनास्थळावरील गल्लीतील लोकांना माहिती नसल्याचे ते पोलिसांना सांगत आहेत.