पूर्णा : उपासकाने बुद्ध विहारात धम्माचे चिंतन करावे, असे प्रतिपादन भदंत उपगुप्त महाथेरो यांनी केले. येथील बोधिसत्व डॉ. बी.आर. आंबेडकर स्मारक व बुद्धविहार समिती यांच्या वतीने बुद्ध विहारात ज्येष्ठ पौर्णिमा व पाली भाषा प्रशिक्षण वर्गाचा समारंभ उत्साहात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रा.डॉ. खेमधम्मो महाथेरो, भदंत पय्यानंद, भदंत पय्यारत्न, भदंत बोधीशील, भदंत सुभूती, भदंत धम्मशील, बी. डी. साळवी, वत्सलाबाई साळवी, डॉ. श्रीराम राठोड, इंजि. भीमराव हटकर आदींची उपस्थिती होती. भदंत उपगुप्त महाथेरो म्हणाले, आजच्या ज्येष्ठ पौर्णिमा दिनाला महत्त्व असून संत कबीर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दीक्षा दिलेले भदंत चंद्रमुनी महाथेरो यांची जयंती म्हणून साजरी करतात. तसेच श्रीलंका, थायलंड, कोरिया, जपान आदी देशात पौर्णिमा हा उत्सव उपासक विहारात साजरा केला जातो, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रकाश कांबळे, देवराव खंदारे, महानंद गायकवाड, दिलीप गायकवाड आदींची उपस्थिती होती. सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी बौद्ध विहार समिती व निरंजना महिला मंडळाच्या वतीने परिश्रम घेण्यात आले. (वार्ताहर)डॉ. श्रीराम राठोड म्हणाले, धम्माचे शिक्षण विद्यार्थ्यांच्या अंगी असणे हेच खरे शिक्षण आहे. संस्कार असणारा व्यक्ती जीवनात यशस्वी होतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. बी.डी. साळवी म्हणाले, बौद्ध विहारात पाली भाषा प्रशिक्षण उपक्रम प्रथमच राबविला असून तो मराठवाड्यासह राज्यातील एकमेव आहे. उपगुप्त महाथेरो म्हणाले, अजिंठा लेणी येथे पाली भाषेचे विद्यापीठ निर्मितीचे काम होणार असून विदेशातील बौद्ध धम्माचे सहकार्य घेऊन भारतात धम्म प्रचार करण्यात येणार असल्याचे सांगितले.
बुुद्धविहारात धम्माचे चिंतन करावे
By admin | Updated: June 15, 2014 00:33 IST