शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही व्यथा निवारण करा, गाथा आपोआप बनेल

By admin | Updated: April 25, 2016 00:46 IST

औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीत अनेक जण भावनेच्या भरात शेतकऱ्यांना मदत करीत आहेत; परंतु शेतकऱ्यांना मदतीपेक्षाही तुमच्या धीराची जास्त गरज आहे.

औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीत अनेक जण भावनेच्या भरात शेतकऱ्यांना मदत करीत आहेत; परंतु शेतकऱ्यांना मदतीपेक्षाही तुमच्या धीराची जास्त गरज आहे. कारण शेतकरी कधीही लाचार होऊ इच्छित नाही. तो देता आहे, असे मत कृषितज्ज्ञ विजय बोराडे यांनी मराठवाडा दुष्काळ संवेदना मेळाव्यात बोलताना व्यक्त केले. तुम्ही व्यथा निवारण करा, गाथा आपोआप बनेल, असा सल्लाही त्यांनी संयोजकांना दिला. जन्मभूमी फाऊंडेशनच्या वतीने देवगिरी महाविद्यालयातील रवींद्रनाथ टागोर सभागृहात दुष्काळ संवेदना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, कृषितज्ज्ञ विजय बोराडे, उद्योजक समीर दुधगावकर, फाऊंडेशनचे नितीन चिलवंत, अ‍ॅड. विठ्ठल भिसे यांची उपस्थिती होती. फाऊंडेशनच्या वतीने परभणी जिल्ह्यातील मानवत आणि पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांना एक लाख बियाणे थैल्या देण्यात येणार आहेत. त्यासाठी फाऊंडेशनने आतापर्यंत पुणे, परभणी आदी ठिकाणी मेळावे घेतले आहेत. विजय बोराडे यांनी फाऊंडेशनच्या या कामाचे कौतुक केले. परंतु सोबतच शेतकऱ्यांना तुमच्या मदतीपेक्षा धीराची गरज अधिक असल्याचे सांगितले. ते म्हणाले, सध्या राज्यात भावनेच्या भरात अनेक जण मदतीसाठी पुढे येत आहेत. मात्र, कोणतीही मदत संबंधित व्यक्तीला लाचार बनविण्याचा धोका असतो. शेतकरी कधीही लाचार बनू इच्छित नाही. तो आज अडचणीत आहे. त्याला तुमच्या मदतीची गरज आहे; परंतु मोठा भाऊ म्हणून त्याला मदत करा, धीर द्या, असेही बोराडे म्हणाले. ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांनीही अडचणीतील शेतकऱ्यांसाठी फाऊंडेशन करीत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. तर उद्योजक समीर दुधगावकर यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नितीन चिलवंत यांच्यासह इतरांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अ‍ॅड. विठ्ठल भिसे यांनी केले. नुसत्या नद्या खोदू नकाकृषितज्ज्ञ विजय बोराडे यांनी नदी खोलीकरणाच्या उपक्रमावर यावेळी जोरदार टीका केली. ते म्हणाले, आज शेतकऱ्यांच्या व्यथा अनेक अंगांनी समजून त्यावर उपाय शोधण्याची गरज आहे. शासनही नुसत्या नद्या उकरत आहे. तुम्ही नदी खोल केली तर माथ्यावरील विहिरींमधील पाणी नदीत येईल. विहिरी कोरड्या होतील. नाल्यात बारमाही पाणी दिसले, पण त्यामुळे नदीभोवतालच्यांचेच भले होईल. शिवाय जमीन पाणी मुरण्यासाठी पोषक थर आपण नाहीसा करतो आहोत. म्हणून खोलीकरणाऐवजी महात्मा फुल्यांनी सांगितलेल्या एकात्मिक पाणलोट विकासाचा मार्ग अवलंबिला पाहिजे, अशी अपेक्षा बोराडे यांनी व्यक्त केली.